rat11p2.jpg-
56537
रत्नागिरी ः शहरातील मांडवी किनाऱ्यावर फिरणारी मोकाट गुरे.
-----------
मोकाट गुरांना पकडण्यास पालिकेची कोंडी
एजन्सींचा अल्प प्रतिसाद; प्राणीमित्रांचे घेणार सहकार्य
रत्नागिरी, ता. ११ : रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. गुरांना पकडून कोंडवाड्यात किंवा निवाराशेडमध्ये आणण्यासाठी कोणतीही एजन्सी तयार नाही. दुसरीकडे धरपकड केली तर प्राणीमित्र संघटना पुढे येत असल्याने या गुरांचे करायचे काय, असा प्रश्न पालिकेसमोर उभा आहे; परंतु दिवसरात्र ही गुरे बिनधास्त मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरून फिरत असतात, बसलेली असतात. त्यामुळे वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पालिका काही गोशाळांच्या संपर्कात आहे. त्यांनी ही गुरे नेली तर हा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे अन्यथा प्राणीमित्र संघटनांनीही याबाबत पर्याय सूचवावा, असे आवाहनदेखील पालिकेने केले आहे.
रत्नागिरी शहरात विकासकामे सुरू आहेत. पालिकेची हद्द सुरू होणाऱ्या साळवीस्टॉपपासून हे बदल दिसण्यास सुरवात होत आहे; परंतु ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मोकाट आणि पाळीव गुरे शहरात शिरली आहेत. त्यांना शहरात अनेक ठिकाणी सहज खाद्य उपलब्ध होत आहे. त्यामुळे ती शहराबाहेर जाण्यास तयार नाहीत. पावसाचा निवारा म्हणून मुख्य बाजारपेठतील कोणत्याही रिकाम्या जागेत किंवा दुकानांच्या आडोशाला ही गुरे बसतात तसेच चौकात, रस्त्याच्या मध्यभागी बिनधास्त वावरत असतात. यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत होत आहे. गुरे शहरात कुठेही वावरत असल्याने आणि वाहनांना किंवा त्यांच्या हॉर्नला दाद देत नसल्याने मोठी वाहतूककोंडी होत आहे. ही गुरे अचानक उधळल्यामुळे किंवा झुंज लागल्याने अनेक ठिकाणी अपघात झाले आहेत. वाहनांचे नुकसान झाले आहे.
----------
चौकट
गोशाळेतील संगोपनाच्या खर्चाची व्यवस्था काय?
शहरात फिरणाऱ्या मोकाट गुरांमध्ये 50 टक्के गुरांचे मालक आहेत; पण ते पुढे येत नाहीत. गुरांना पकडले की, प्राणीमित्र त्याला विरोध करत आहेत, असे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे प्राणीमित्र आणि पालिकेने एकत्र येऊन यावर पर्याय काढणे आवश्यक आहे. पालिकेने केलेल्या आवाहनाला काही संस्थांनी प्रतिसाद दिला आहे तसेच काही गोशाळादेखील पुढे आल्या आहेत. त्या या मोकाट गुरांना नेऊन त्यांचे संगोपन करण्यास तयार आहेत; मात्र त्याच्या संगोपनाच्या खर्चाची व्यवस्था कोण करणार याबाबत कोणीच बोलायला तयार नाही.
-------------
कोट 1
मोकाट गुरांचा उपद्रव वाढला आहे. आम्हाला देखील ही गंभीर समस्या दिसते. गुरांना पकडून निवाराशेड किंवा गोशाळेत देण्याचा प्रयत्न आहे; परंतु त्याला प्राणीमित्रांकडून विरोध होत आहे. त्यामुळे त्यांनी देखील याबाबत उपाय सुचवावा. आम्ही तसा प्रयत्न करू. काही गोशाळादेखील संपर्कात आहेत. त्यामुळे लवकरच यावर पर्याय निघेल.
- उदय सामंत, पालकमंत्री, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.