Har Ghar Tiranga 2026 : १५ ऑगस्टपूर्वी पंतप्रधान मोदींचा खास संदेश; ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचं देशवासियांना आवाहन

Independence Day 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिन अभिमानाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
PM Modi urges citizens to join Har Ghar Tiranga 2026

PM Modi urges citizens to join Har Ghar Tiranga 2026

esakal

Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना 'हर घर तिरंगा' मोहिमेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक घरात राष्ट्रध्वज फडकवून उत्सवाचे वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केलेआहे. इन्स्टाग्रामवर या मोहिमेशी संबंधित एक व्हिडिओ शेअर करताना पंतप्रधानांनी लिहिले, "चला, प्रत्येक घरात #HarGharTiranga (हर घर तिरंगा) साजरा करूया." हा व्हिडिओ संदेश १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यापूर्वी आला आहे, संपूर्ण देश आपल्या स्वातंत्र्याचा ८० वा वर्धापन दिन साजरा करणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com