कोकण

कासार्डे केंद्रशाळा येथे कृषी मेळावा उत्साहात

CD

swt1117.jpg
56623
कासार्डे : येथे कृषी मेळाव्यानिमित्त कृषी विषयक प्रदर्शन व मार्गदर्शन करण्यात आले.

कासार्डे केंद्रशाळा येथे
कृषी मेळावा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १२ : कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट यांच्या कासार्डे व तळेरे विभागाच्यावतीने केंद्रशाळा कासार्डे नं. १ येथे कृषी मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शेतीविषयक ज्ञान, कृषी तंत्रज्ञानाची माहिती आणि शेतीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाला कासार्डे सरपंच निशा नकाशे, श्रीरंग पाताडे, डॉ. दर्शना कदम, शरद आंबेरकर, वेदांत जोशी, सुशीलकुमार मोटे, रजनी किल्लेदार, समृद्धी देसाई, आनंद तांबे, दीपक पवार आदी उपस्थित होते. यावेळी सरपंच निशा नकाशे, डॉ. दर्शना कदम तसेच वेदांत जोशी यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक शेती, कृषी शिक्षणाचे महत्त्व, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतीतील करिअरच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले. या कृषी मेळाव्यात कासार्डे येथील वरुण पवार, चैतन्य कोरके, प्रथमेश खंडागळे, ओंकार तवटे, अथर्व शिखरे, ऋषिकेश पोवाडी, इंद्रजीत मिसाळ, प्रथमेश शिवुडकर, राज चव्हाण, अनिल काकड तसेच तळेरे येथील अरिहंत अंकलकोपे, संग्राम पाटील, आदर्श कोरे, रोहित देशपांडे, तन्मय पलये, हर्षय पलये, ओमकार सुतार, प्रतीक मोरसकर, शर्विल पाटील, हिमांशू राणे या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भक्ती कल्याणकर, सारिका तसेच इतर सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे गटाची याचिका, निवडणूक आयोगावर सवाल अन् धनुष्यबाणाचा पेच; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? १० मुद्द्यांमध्ये जाणून घ्या

RTI Penalty Vasai-Virar: वसई-विरार महापालिकेला ५० हजारांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश; RTI अर्जदाराला मानसिक-आर्थिक त्रास

Marathi poetry translation in Mexico: मराठी काव्यानुवादाचा मेक्सिकोत डंका; डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या अनुवादित कविता ‘अल्किमिया देव रेलाम्पागो’मधून प्रकाशित

Marathi News Live Updates : माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध, संसदीय समितीचा अहवाल समोर..

Viral Video : आजीचं स्वप्न नातीने केलं पूर्ण; पहिल्यांदाच विमानात बसवून नेलं गोव्याला, हृदयस्पर्शी व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT