56637
मनोज मुसळे यांचे निधन
सावंतवाडी, ता. ११ ः येथील प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज शंकर मुसळे (वय ५५, रा. कणकवली) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. प्रकृती अचानक अस्वस्थ झाल्याने त्यांना तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मुसळे यांनी महसूल विभागात प्रदीर्घ सेवा बजावली. आपल्या सेवाकाळात त्यांनी कणकवली, वैभववाडी, मालवण, कुडाळ आणि सावंतवाडी येथील तहसीलदार कार्यालयांमध्ये नायब तहसीलदार म्हणून जबाबदारी सांभाळली. सध्या ते सावंतवाडी प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होते. महसूल प्रशासनातील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेले कर्तव्यनिष्ठ आणि अनुभवी अधिकारी म्हणून परिचित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.