कोकण

दत्त प्रतिष्ठानतर्फे बोरज येथे 75 वृक्षांची लागवड

CD

बोरज येथे ७५ वृक्षांची लागवड
दत्त प्रतिष्ठानचा पुढाकार; हिरवाईचा संकल्प
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ११ ः पर्यावरण संवर्धनाचा संदेश कृतीतून देत ‘श्री दत्त सेवाभावी प्रतिष्ठान’ (मुंबई-ठाणे-पुणे) यांच्या वतीने तालुक्यातील बोरज येथे वृक्षारोपण अभियान उत्साहात पार पडले. या अभियानांतर्गत परिसरात ७५हून अधिक विविध प्रकारच्या फळ व झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली तर ५०० सीडबॉल्सचे रोपण करून बोरज परिसर अधिक हिरवागार करण्याचा दृढ संकल्प करण्यात आला.
बोरज बसस्टॉप, स्मशानभूमी आणि ग्रामदेवी मंदिर परिसर या सार्वजनिक ठिकाणी ही वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि पुढील पिढीसाठी समृद्ध हरित वारसा निर्माण करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रतिष्ठानच्यावतीने सांगण्यात आले. या अभियानात मुंबई, ठाणे आणि पुणे येथून आलेल्या प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांसह त्रिमूर्ती युवा मंडळाच्या सदस्यांनी व स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्रमदान केले. या उपक्रमासाठी लागणारी रोपे अजय शिंदे यांच्या सहकार्याने ‘श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ (लोटे) यांनी उपलब्ध करून दिली होती.
या कार्यक्रमास बोरज-निगडे ग्रुपग्रामपंचायतीचे सरपंच विशाल घोसाळकर, माजी सरपंच अशोक शिंदे, परशुराम शिंदे, संतोष शिंदे, शांताराम शिंदे, रूपेश तांबट आणि विनीत शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Har Ghar Tiranga 2026 : १५ ऑगस्टपूर्वी पंतप्रधान मोदींचा खास संदेश; ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचं देशवासियांना आवाहन

Nashik News : महाडीबीटीचे पोर्टल अडीच महिन्‍यांपासून ठप्प! सुमारे ७२ शासकीय योजनांचा बोजवारा; विद्यार्थी-संस्‍थाचालकांना मनस्‍ताप

Marathi News Live Updates : हार्बर लोकल पावसामुळे 10-15 मिनिटं उशीराने

Jalgaon News : तरुण उद्योजकाने सात लाखांसाठी संपविले जीवन; सुसाईड नोट लिहून घेतला गळफास

Jalgaon News : ‘उमेद’च्या बळावर जळगावची नारीशक्ती आत्मनिर्भरतेकडे; तब्बल ३१ हजारांहून अधिक बचतगटांचे जाळे, साडेचारशे कोटींहून अधिक कर्ज वितरित

SCROLL FOR NEXT