56737
सुदृढतेसाठी आहारामध्ये
रानभाजीला नाही पर्याय!
आजगाव शाळेच्या विद्यार्थ्यांचा संदेश
आरोंदा, ता. ११ ः आजगाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच व्यावहारिक ज्ञान मिळावे तसेच परिसरात उपलब्ध असलेल्या विविध रानभाज्यांची माहिती व्हावी, या उद्देशाने रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री महोत्सव आयोजित करण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रभारी सरपंच सुशील कामटेकर, ग्रामपंचायत अधिकारी संदीप गवस, ग्रामपंचायत सदस्या वर्षा रेवाडकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळकृष्ण हळदणकर, उपाध्यक्ष दशमी दळवी, माजी उपाध्यक्षा दिशा मालवणकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, केंद्रप्रमुख संजीवनी कोकितकर, मुख्याध्यापिका समृद्धी म्हाडगुत, शिक्षिका दीपाली केदार, सृष्टी पेडणेकर, दीपाली पाटील आदी उपस्थित होते. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी परिसरातील विविध रानभाज्यांची माहिती संकलित करून त्यांचे प्रदर्शन व विक्री केली. ग्रामस्थ वासुदेव सावंत यांनी विद्यार्थ्यांकडून तब्बल एक हजार रुपयांची रानभाजी खरेदी करून ती शालेय पोषण आहारासाठी वापरण्यास दिली. ॲड. स्वप्नील आजगावकर यांनी शाळेच्या या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून तीन हजार रुपयांची रोख रक्कम दिली. दीपाली पाटील यांनी प्रस्तावना केली. मुख्याध्यापिका समृद्धी म्हाडगुत यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.