कोकण

देवरूखच्या चार खेळाडूंची निवड

CD

देवरूखच्या चौघांची राज्यस्तरीय भरारी
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. १२ : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या चार खेळाडूंनी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेत सार्थक आडशे याने गोळाफेकमध्ये प्रथम तर उंच उडीत द्वितीय क्रमांक मिळवला. साईराज आंब्रे याने उंच उडीत प्रथम आणि गोळाफेकमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. चेतन खामकर याने ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि व्यंकटेश इंदुलकर याने भालाफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रत्नागिरी जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेतर्फे डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शिवसेना पक्ष, चिन्ह संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी

Atiq Ahmed Son Accident Video: अतिक अहमदच्या मुलाचा अपघात कसा झाला? कार डिव्हायडरला धडकली अन् हवेत उडाली, Live Video Viral

Scam 2010 Marathi Actor: SCAM 2010 मध्ये झळकणार मराठमोळा चेहरा; तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्याला? पत्नी गाजवतेय मराठी मालिका

YCMOU Exam: धक्कादायक! एकाच विद्यार्थ्याने एकाच वेळी दिल्या दोन परीक्षा, 'मुक्त'च्या परीक्षेत ४० जणांचा प्रताप; विद्यापीठाकडून दखल

Ethanol Production Restrictions: उसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध?; साखरेचे भाव नियंत्रणासाठी उत्पादन वाढविणार

SCROLL FOR NEXT