कोकण

एनसीएमसी कार्ड नोंदणी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

rat१२p३.jpg-
26O56758
रत्नागिरी- शहरातील प्रभाग क्र. ५ मध्ये आयोजित कॅम्पचा लाभ घेताना महिला व ज्येष्ठ नागरिक. सोबत त्यांना मदत करताना नगरसेवक सौरभ मलुष्टे व त्यांची टीम.
----
प्रभागातच ‘एनसीएमसी’ कार्डची सुविधा
सौरभ मलुष्टेंचा उपक्रम; पाचशे जणांची नोंदणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : एसटी बस प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलतींचा लाभ सुलभतेने घेता यावा, यासाठी नगरसेवक सौरभ मलुष्टे यांच्या पुढाकार घेतला. त्यांनी प्रभाग क्र. ५ मध्ये आयोजित तीन दिवसीय ‘एनसीएमसी कार्ड’ नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कॅम्पच्या माध्यमातून ५०० जणांनी कार्डची नोंदणी केली.
शासकीय योजना व सवलतींचा लाभ नागरिकांना कोणत्याही अडथळ्याविना देणे, हा या नोंदणी शिबिरामागचा मुख्य उद्देश होता. बसस्थानकावर होणारी गर्दी आणि रांगा टाळून थेट प्रभागातच ही सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी मलुष्टे यांचे आभार मानले. कॅम्पच्या यशस्वी आयोजनासाठी सौरभ मलुष्टे मित्रमंडळाचे सभासद चिनार आचरेकर, शिवराज पाटील, अभिषेक सुर्वे, दिनेश जठार, चिनार प्रसादे, योगेश विरकर, तृप्ती विरकर, तेजल पाटील, सुनील बेंडखळे, राजा बामणे, अविनाश भोसले, सुरज सावंत, दीपक मेस्त्री आणि प्रेमराज फोडकर आदींनी परिश्रम घेतले. समृद्धी सर्व्हिसेसचे संदीप चव्हाण व स्नेहा चव्हाण यांनी कॅम्पसाठी तांत्रिक व प्रशासकीय सहकार्य केले. या उपक्रमाला पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, शिवसेना पदाधिकारी राहुल पंडित, बिपिन बंदरकर आणि बंड्या साळवी आदींचे मार्गदर्शन लाभले.
----

कोट
प्रभागातील प्रत्येक नागरिकाला शासकीय योजना आणि सार्वजनिक सुविधांचा लाभ त्यांच्या घराजवळ सहज मिळावा यासाठी मी कटिबद्ध आहे. भविष्यातही नागरिकांच्या सोयीसाठी अशा स्वरूपाचे विविध उपक्रम प्रभागात राबवले जातील.

- सौरभ मलुष्टे, शिवसेना नगरसेवक, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात घमासान! सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाची पोलखोल; दिला थेट पुरावा; म्हणाले ''आयोग खोटं बोलतोय''

FSSAI Pan Masala Rules: पान मसाला खाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! FSSAI चा कंपन्यांना दणका, नवे नियम लागू, जाणून घ्या काय बदललं?

Gold Price: सोन्यात १० हजारांची, तर चांदीत २० हजारांची उसळी; सुवर्ण बाजाराची तेजीकडे वाटचाल

Marathi News Live Updates : शिवसेना पक्ष, चिन्ह संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT