कोकण

कर्जमुक्तीत अॅग्रीस्टॅक, ई-केवायसीची अडचण

CD

कर्जमुक्तीच्या लाभाला ‘ॲग्रीस्टॅक’चा अडथळा
अहिल्यादेवी कर्जमुक्ती योजना; तीन हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण प्रलंबित
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाकडून वेगाने प्रक्रिया सुरू आहे; मात्र, ‘ॲग्रीस्टॅक’, आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसीच्या तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहिल्या यादीत जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधून ७ हजार ७८ शेतकरी पात्र ठरले होते त्यांपैकी ५३ शेतकरी विविध कारणांमुळे अपात्र ठरल्याने सध्या ७ हजार २५ शेतकरी पात्र आहेत.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी ॲग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण अनिवार्य असून, त्यानंतरच ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण होते. आतापर्यंत जिल्ह्यातील ३ हजार ८८८ शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून तब्बल ३ हजार १४१ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहे. या योजनेत नाव असूनही लाभार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही शेतकरी मृत झाले आहेत तर काही देवस्थान जमिनीशी संबंधित आहेत. याशिवाय परगावी स्थलांतरित शेतकरी, बायोमेट्रिक जुळत नसलेले लाभार्थी, जमीन नावावर नसताना संमतीपत्रावर कर्ज घेतलेले शेतकरी तसेच ॲग्रीस्टॅक पूर्ण होऊनही पोर्टलवर नाव न दिसणे अशा तांत्रिक त्रुटींमुळे उर्वरित शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या २ हजार ८३२ शेतकऱ्यांना आतापर्यंत १२ कोटी ९३ लाख ६८ हजार ६७८ रुपये कर्जमुक्ती मंजूर झाली आहे. शासनाकडून ही रक्कम थेट कर्जखात्यात वर्ग केली जाणार असून, त्यानंतर हे शेतकरी नवीन पीककर्ज घेण्यास पात्र ठरणार आहेत.
---
पात्र शेतकऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण करा
कोणताही पात्र शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहू नये यासाठी ॲग्रीस्टॅक, आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांचे प्रमाणीकरण बाकी आहे त्यांनी ‘आपले सरकार सेवाकेंद्रात जाऊन कर्जमाफीच्या यादीत आपले नाव तपासावे व तांत्रिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी,’ असे आवाहन जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Rain Alert : मोठी बातमी! माॅन्सूनच्या एक्झिट दरम्यान 22 राज्यांत मुसळधार पावसासह वादळाचा अलर्ट; 70 किमी स्पीडने वाहणार वारे, महाराष्ट्रात कशी स्थिती?

Pocso News : फेसबुकवरील मैत्री पडली महागात ! हॉटेलमध्ये बोलावून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Palghar Earthquake : पालघरला भूकंप,३.७ रिश्टर स्केलचा धक्का; तलासरी तालुक्यातील कुर्झे केंद्रबिंदू, सात किलोमीटर खोलीवर भूकंपाची नोंद

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्र्यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

नानांच्या अखेरच्या प्रवासात पत्नी-मुलाची अवस्था पाहून डोळे पाणावतील; नीलकांती आणि मल्हार यांचा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT