swt123.jpg
56779
सिंधुदुर्गनगरी : येथे लेखक बळीराम कदम यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
बळीराम कदम यांच्या पुस्तकांचे प्रकाशन
ओरोस : वर्दे (ता. कुडाळ) येथील लेखक बळीराम कदम यांच्या ‘कन्वर्जन फॉर बुद्धिझम’ आणि ‘ब्युटी इन एथिक्स’ या तत्त्वज्ञानविषयक दोन पुस्तकांचे प्रकाशन कोकण कला साहित्य गौरव संमेलनात करण्यात आले. सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवनाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्याला साहित्य, कला आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. पुस्तक प्रकाशन सोहळ्यास संगीतकार अतुल दिवे, अभिनेत्री श्रुती पारकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, विभागीय चौकशी अधिकारी विजय चव्हाण, ज्येष्ठ दशावतार कलावंत दादा राणे कोनस्कर, समृद्धी पब्लिकेशनचे संचालक डॉ. बी. एन. खरात, दादा मडकईकर तसेच सी. ऋतुजा परब उपस्थित होते. लेखक कदम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतराच्या निर्णयामागील वैचारिक भूमिकेचा ‘कन्वर्जन फॉर बुद्धिझम’मधून वेध घेतल्याचे सांगितले. ‘ब्युटी इन एथिक्स’या पुस्तकातून नीतीमूल्यांचे समाजाच्या जडणघडणीतील महत्त्व अधोरेखित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रा. नरेंद्रकुमार चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.