परिवर्तन.... लोगो
(६ ऑगस्ट टुडे ३)
देवाच्या नावे पशुहिंसा करतात,
त्यांना हिंसा कशी समजणार?
चैतन्य जसे सर्वव्यापी असते त्याला आपपर भाव नसतो तसेच आपण कोणाचाही द्वेष न करता जीवनात कर्म करत राहावे. मनात कोणाबाबतही द्वेष असू नये.
हें विश्वचि माझें घर। ऐसी मती जयाची स्थिर।
किंबहुना चराचर। आपण जाहला। अध्याय १२ ओवी २१३
अर्थ-सर्व विश्व हेच माझे घर आहे, अशी संभावना झाल्यावर विश्वातील चराचरात व आपल्यात काही भेद राहात नाही.
हे विश्व आपले घर आहे. या विश्वतील चराचरापैकी आपण एक आहोत, अशी भावना ठेवून जगल्यास मन:शांती मिळणारच; पण या विश्वाविषयी आपली अशी भावना नसते. आपपरभाव, मत्सर, द्वेष इत्यादींचा आपल्यावर अंमल असतो मग मनःशान्तीसाठी ईश्वरोपासना करण्यात येते; पण त्याने तरी मन:शांती मिळते का? त्यानेही ती मिळत नसावी असे थोडे धाडसाने म्हणवे लागते.
- rat१२p२.jpg-
26O56757
- डॉ. शरद प्रभूदेसाई, रत्नागिरी
---
तंव तिये इष्टीचा बुडीं। पशुहिंसा रोकडी।
मग अहिंसेची थडी। कैची दिसे॥ अध्याय१३ ओवी २२२
अर्थ-देवाच्या नावे पशुहिंसा करतात त्यांना हिंसा कशी काय समजणार?
पेरिजे नुसधी हिंसा। तेथ उगवैल काय अहिंसा।
परि नवल बापा धिंवसा। या याज्ञिकांचा ॥अध्याय१३ ओवी २२३
अर्थ-अशा प्रकारे हिंसेचा मार्ग अवलंबल्यावर अहिंसा कशी काय रूजणार? खरंच, या याज्ञिकांचे नवलच वाटते.
माणूस पुण्य संपादनासाठी नाना यज्ञ करतो. यामध्ये पशुबळी दिले जातात. अर्थात, अलिकडे हे प्रमाण कमी झाले आहे. अशी हिंसा करून आपल्या मनात अहिंसा धरेल का? काही शुभ होण्यासाठी हे यज्ञ केले जातात. याज्ञिक मंडळी याचा स्वीकार करतात; पण अशा यज्ञाची गरज आहे का? याबाबत ज्ञानेश्वरानांच प्रश्नचिन्ह केले आहे. अशी आराधना नकोच, असं त्यांचे मत आहे.
तेराव्या अध्यायातील खालील ओव्या ‘श्री’ने वाचल्या. या ओव्यांतील ईश्वरोपासनेबाबत ज्ञानेश्वरांची मते वाचल्यावर एकंदरीतच ईश्वरोपासनेबाबत पूर्ण मतपरिवर्तन झाले.
आणि भजिन्नलियासवें। तो विषो जरी न पवे।
तरी सांडी म्हणे आघवें। टवाळ हें ।अध्याय १३ ओवी ८१०
अर्थ-भजन करून इप्सित फळ न मिळाल्यास भजन करणे सोडतोच आणि भजन म्हणजे चक्क टवाळकी आहे, असा शेरा मारतो.
कुणबट कुळवाडी। तैसा आन आन देव मांडी।
आदिलाची परवडी। वरी तया। अध्याय १३ ओवी ८११
अर्थ-शेतकरी जसा रोज नवनव्या कामात व्यस्त असतो तसेच काही दररोज नवनव्या देवतेची पूजा करतात आणि आदल्या दिवशीच्या देवतेची परवड करतात.
तया गुरूमार्गा टेके। जयाचा सुगरवा देखे।
तयाचा मंत्र शिके। येरू नेघे ।अध्याय १३ ओवी ८१२
अर्थ-भपकेबाज गुरूकडून मंत्र घेतो त्यावर श्रद्धा बाळगतो. बाकी कोणाचाच विचार करत नाही.
प्राणिजातेंसां निष्ठुरू। स्थावरी बहु भरू।
तेवीचां नाहां एकसरू। निर्वाहो जया । अध्याय १३ ओवी ८१३
अर्थ-प्राणीमात्रांशी निष्ठूरपणाने वागतो. देवाच्या स्थावर प्रतिमांची जास्त भक्ती करतो. अर्थात, त्यामध्येही एकनिष्ठ असतो असे नाही.
माझी मूर्ति निपंजवी। ते घराचां कोनी बैसवी ।
आपण देवो देवी। यात्रे जाय ।अध्याय १३ ओवी ८१४
अर्थ-देवाची मूर्ती तयार करतो तिची कोनाड्यात प्रतिष्ठापना करतो. आपण विविध देवदेवतांच्या यात्रेला जातो.
नीच आराधन माझें। काजीं कुळदेवता भजे।
पर्वविशेषें कीजे। पूजा आना ।अध्याय १३ ओवी ८१५
अर्थ-माझी आराधना दररोज करतो. मध्येच प्रसंगविशेष कुलदेवतेचेही पूजन करतो. काही खास वेळी आणखी नवीनच देवतेची पूजा करतो.
माझे अधिष्ठान घरां। आणि वोवसे आनाचे करी।
पितृकार्यावसरीं। पितरांचा होय। अध्याय १३ ओवी ८१६
अर्थ-घरी माझी स्थापना करतो त्याचवेळी इतर देवतांची व्रते करतो. पितृकार्याचे वेळी पितरांचा दास होतो.
एकादशीचां दिवसीं। जेतुला पाडू आम्हांसी।
तेतुलाचि नागांसी। पंचमीचां दिवशीं। अध्याय १३ ओवी ८१७
अर्थ-एकादशीच्या दिवशी मला (देवाला) जेवढा भजतो तितकाच मान नागपंचमीला नागाला देतो.
चौथ मोटकी पाहे। आणि गणेशाचाचि होये ।
चावदसी म्हणे माये। तुझाच वो दुर्गे ।अध्याय १३ ओवी ८१८
अर्थ-चतुर्थीला गणपतीचा भक्त होतो तर चतुर्दशीला दुर्गेला मी तुझाच दास आहे म्हणतो.
नित्य नैमित्तिकें कर्मे सांडी। मग बैसे नवचंडी।
आदित्यवारां वाढी। भैरवां पात्रीं ।अध्याय १३ ओवी ८१९
अर्थ-नित्यनैमित्तिक कर्मे न करता नवचंडी याग करतो आणि रविवारी भैरवांसाठी पानें मांडतो
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.