कोकण

एक राखी सैनिकांसाठी उपक्रम

CD

राखीच्या धाग्यातून जवानांना सलाम
युनायटेड स्कूलचा उपक्रम ; विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ ः येथील परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूलतर्फे ‘माझा देश, मी देशाचा’ या उपक्रमांतर्गत ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम १७ ऑगस्टपासून राबवण्यात येत आहे. संस्थेच्या विविध शाखांमधील सुमारे ४२०० विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती मुख्याध्यापक संजय बनसोडे यांनी दिली.
परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या चिपळूणमधील गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल, प्रेमाजीभाई आसर मराठी माध्यम स्कूल, गुरूकुल, तसेच अन्य शाखांमधील विद्यार्थिनींनी सैनिकांसाठी स्वतः राख्या तयार केल्या आहेत. या राख्यांसोबत शाळेचे पत्र आणि राखी तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाताचे ठसेही असणार आहेत. प्रत्येक सैनिकापर्यंत राखी पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच शाळेत शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांचे वडील सैन्यात कार्यरत आहेत त्यांच्या मातांच्या हस्ते राखी पूजन केले जाणार आहे. यानंतर विद्यार्थी राख्या घेऊन चिपळूण पोस्ट कार्यालयाकडे रवाना होतील. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथक या फेरीचे नेतृत्व करणार आहे. या वेळी संस्थेचे पदाधिकारी, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी संजय मोहिते, तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्यासह अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Supreme Court Hearing: ठाकरे गटाची याचिका, निवडणूक आयोगावर सवाल अन् धनुष्यबाणाचा पेच; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? १० मुद्द्यांमध्ये जाणून घ्या

RTI Penalty Vasai-Virar: वसई-विरार महापालिकेला ५० हजारांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश; RTI अर्जदाराला मानसिक-आर्थिक त्रास

Marathi poetry translation in Mexico: मराठी काव्यानुवादाचा मेक्सिकोत डंका; डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या अनुवादित कविता ‘अल्किमिया देव रेलाम्पागो’मधून प्रकाशित

Marathi News Live Updates : माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध, संसदीय समितीचा अहवाल समोर..

Viral Video : आजीचं स्वप्न नातीने केलं पूर्ण; पहिल्यांदाच विमानात बसवून नेलं गोव्याला, हृदयस्पर्शी व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT