कोकण

चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन

CD

-rat१२p१३.jpg-
26O56803
रत्नागिरी ः महेंद्र पंतमिराशी, मंदार गोखले, ज्ञानेश धानोरकर-जोशी
-----
दापोलीत रंगणार १५वा कीर्तन सप्ताह
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे धार्मिक व पवित्र अशा श्रावण महिन्याचे औचित्य साधून कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन सप्ताहाचे हे सलग १५वे वर्ष असून, १६ ते २३ ऑगस्ट दरम्यान कीर्तने रंगणार आहेत. उद्‍घाटनाचे कीर्तन रत्नागिरी येथे झाल्यानंतर सोमवार (ता.१७) सात दिवस दापोलीतील सात गावांमध्ये हा सप्ताह त्या त्या ठिकाणच्या देवस्थान मंडळांच्या सहकार्याने साजरा होणार आहे.
रविवारी (ता.१६) सायंकाळी ५ ते ७ या वेळात भगवान परशुराम सभागृहात वरवडे-कणकवली येथील कीर्तनकार महेंद्रबुवा पंतमिराशी कीर्तन करतील. ऑर्गनची साथ निरंजन गोडबोले व तबलासाथ वेदांत कोकजे करेल. १७ला रात्री १० वाजता पंचनदी येथील श्री सप्तेश्‍वर देवस्थानमध्ये, १८ला रात्री १० वाजता हर्णै येथील एकनाथ देवस्थानात १९ला रात्री १० वाजता मुरूड येथील श्री पूर्वाभिमुख लक्ष्मीनारायण मंदिरात कीर्तन होईल. ही कीर्तने पुण्याचे युवा कीर्तनकार मंदार गोखले करतील. २०ला रात्री १० वाजता आडे येथील श्रीराम मंदिरात, २१ला सायंकाळी सात वाजता आंजर्ले येथील श्री दुर्गादेवी मंदिरात पुण्याचे युवा कीर्तनकार ज्ञानेश धानोरकर- जोशी कीर्तन सादर करतील. २२ला रात्री १० वाजता आसूदच्या श्री गणपती मंदिरात आणि २३ला सकाळी १०.३० वाजता जालगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी पादुका मंदिरात भिवंडीचे कीर्तनकार अभय घांग्रेकर कीर्तने सादर करतील. या कीर्तनांना दापोली येथील ऑर्गनवादक अनुराग बाळ व वरद दातार तर तबल्याची साथ सोहम जोशी, महेश मेहेंदळे, देविदास दातार व प्रथमेश फाटक हे करणार आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Zika Virus: पुण्याला ‘झिका’चा धोका कायम! विषाणूच्या जनुकीय संरचनेतही आढळले बदल; ‘एनआयव्‍ही’च्‍या शास्‍त्रज्ञांचा शोध

Sunetra Pawar: दुष्काळग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून धीर; पाणी, चारा, शिक्षणासाठीही मदत

IND vs WI 1st ODI Live: रोहित शर्मा बाद झाला, विराट कोहली मैदानावर आला... येताच २८ वर्षांपूर्वीचा मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला...

४ वर्षात १११ खासदार-आमदारांचे पक्षांतर, सर्वाधिक इनकमिंग झालेला पक्ष भाजप नव्हे, भाजपात २९ जणांचा प्रवेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

SCROLL FOR NEXT