कोकण

विद्यार्थ्यांनी जाणून घेतला नगराध्यक्षांचा राजकीय प्रवास

CD

-rat१२p२४.jpg-
26O56849
रत्नागिरी : नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांचे स्वागत करताना गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या डॉ. सोनाली कदम. सोबत बी. डी. सुतार, प्रा. नीलेश पाटील, प्रा. अक्षय झोरे आदी.
-----
कुटुंबाच्या पाठिंब्याने राजकारणात भरारी
नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे ः विद्यार्थ्यांनी घेतली मुलाखत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : कुटुंबात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मी राजकीय क्षेत्रात आले आणि कुटुंबीयांच्या मिळालेल्या पाठिंब्यामुळे मी नगराध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकले. या पदावर कार्यरत असताना अधिकाधिक लोकहिताची कामे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी व्यक्त केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी पालिकेत घेतलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. महाविद्यालयात आपण साऱ्याजणी हे भित्तीपत्रक प्रकाशित करण्यात येते. या भित्तीपत्रकासाठी राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी नगराध्यक्षांशी संवाद साधला. नगराध्यक्षा सुर्वे यांनी लोकप्रतिनिधी आणि नगराध्यक्ष म्हणून करत असलेले कार्य आणि जबाबदाऱ्या, रत्नागिरी शहराच्या विकासासाठी सुरू असलेले विविध उपक्रम अशा अनेक पैलूंवर विद्यार्थ्यांनी संवाद साधला. महिला विकास कक्षाच्या समन्वयिका डॉ. सोनाली कदम यांनी सुर्वे यांचे स्वागत केले. या प्रसंगी सदस्य प्रा. बी. डी. सुतार, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. नीलेश पाटील, प्रा. अक्षय झोरे आदी उपस्थित होते.
---

State Government: बंदीवान मच्छीमारांच्या कुटुंबांना मदत, ८९ दिवसांसाठी २६ हजार रुपये; राज्य सरकारचा निर्णय

Inspiring Farmer Story : सिमला मिरचीची शेती अन् 20 लाखांचे उत्पन्न! पारंपरिक शेतीला फाटा देत माजलगावच्या ज्योती डक यांनी 4 एकर ढोबळी मिरचीतून कमावले लाखो रुपये

Ganeshotsav: हिंदू धर्मात विसर्जनाचा उल्लेख आहे? लेखी पुरावा सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Latest Marathi News Live Update : कलम २९ए(९) हे राजकीय पक्षाच्या नोंदणीनंतर लागू होते, परंतु त्यात नमूद केलेल्या माहितीपुरतेच ते मर्यादित आहे - न्यायासन

Sainik Takli MIDC : सैनिक टाकळीत एमआयडीसीचा मार्ग मोकळा? तरुणांना रोजगाराच्या हजारो संधी होणार उपलब्ध; आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरांचा दावा

SCROLL FOR NEXT