कोकण

डीजीकेत आविष्कार समितीची कार्यशाळा

CD

‘डीजीके’त आविष्कार समितीची कार्यशाळा
रत्नागिरी ः दापोली अर्बन बँक वरिष्ठ महाविद्यालयात आयोजित आविष्कार संशोधन कार्यशाळेत देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या (डीजीके) आविष्कार समितीच्या प्रमुख प्रा. सानिका कीर, प्रा. सिद्धी साळवी व प्रा. आसावरी मयेकर, विद्यार्थिनी निलाक्षी राऊत, संगीता कांबळे व गौरी शिंदे यांनी भाग घेतला. कार्यशाळेत वेगवेगळ्या सत्रांमधून आविष्कार स्पर्धेचे महत्व, स्पर्धेचे नियम व अटी, संशोधनाचा समाजासाठी होणारा प्रत्यक्ष उपयोग याबाबत मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील, आविष्कार संशोधन समितीच्या विशेष कर्तव्य अधिकारी डॉ. मीनाक्षी गुरव यांनी मार्गदर्शन केले.

‘अभाविप’तर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार
रत्नागिरी ः अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दक्षिण रत्नागिरी शाखेतर्फे दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात झाला. या वेळी आनंद पंडित, अभाविप जिल्हाप्रमुख प्रा. अमोल सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. प्रमुख वक्त प्रा. सहस्त्रबुद्धे यांनी विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यशावर न थांबता समाज आणि राष्ट्राच्या उभारणीत आपले योगदान देण्याचे आवाहन केले. मंचावर अभाविपचे विभाग संयोजक सुमीत पाध्ये उपस्थित होते. शहर सहमंत्री यश काळे यांने आभार मानले.

‘राष्ट्राच्या प्रगतीत तरुणांनी योगदान द्यावे’
रत्नागिरी : देशाच्या सुरक्षिततेसमोरील विविध आव्हानाचा उल्लेख करून देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच राष्ट्राच्या प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी तरुणांनी सज्ज राहिले पाहिजे, असे प्रतिपादन श्वेता घाटविलकर यांनी केले. सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका संजना तारी होत्या. दिव्यता नागवेकर यांनी सूत्रसंचालन केले.

बारटक्के इन्स्टिट्यूट-वन्स एन झिरोज् टेकमध्ये करार
रत्नागिरी : विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यावहारिक ज्ञान, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या बारटक्के इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संगणक प्रशिक्षण संस्था आणि वन्स एन झिरोज टेक सोल्यूशन्स प्रा. लि. या आस्थापनेसोबत बारटक्के इन्स्टिटयूटमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील बदलत्या गरजा समजून घेण्याची तसेच प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. या वेळी बारटक्के इन्स्टिट्यूटच्या समन्वयक अनुजा घारपुरे तसेच वन्स-एन-झिरोज टेक सोल्युशन्सचे संचालक अमोल सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.


विद्यार्थी सचिवपदी स्वराली इंदुलकर
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थी सचिवपदी तृतीय वर्ष विज्ञान शाखेची स्वराली इंदुलकर ही निवडून आली. तृतीय वर्ष वाणिज्य शाखेची गौरवी ओळकर हिची विद्यार्थी उपसचिव म्हणून निवड झाली. महाविद्यालयातर्फे प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. विनय बावदाने, वाणिज्य शाखा प्रमुख प्रा. राखी जाधव, निवडणूक साक्षरता मंचचे प्रमुख प्रा. विनय कलमकर यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.


-ratchl१२२.jpg ः
26O56850
चिपळूण ः तिर्था लाड यांचा सत्कार करताना आमदार भास्कर जाधव


ठाकरे सेनेच्या चिपळूण तालुका
युवती अधिकारीपदी तिर्था लाड
चिपळूण ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिपळूण तालुका युवती अधिकारीपदी तिर्था मंदार लाड यांची नियुक्ती करण्यात आली. याबद्दल शिवसेना नेते तथा आमदार भास्करराव जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार जाधव यांनी तीर्था लाड यांचे अभिनंदन करून तुमच्यावर सोपविलेली जबाबदारी ही जनतेशी जोडलेली आहे. प्रामाणिकपणे चांगले काम करा आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढा, असे सांगितले. या वेळी नवनियुक्त उपतालुका युवती अधिकारी श्रीया खेडेकर यांचेही अभिनंदन करण्यात आले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Hearing: शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं? संजय राऊतांना जिंकण्याचा विश्वास, म्हणाले...

Sukhbir Singh Badal: पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर, नेमकं काय घडलं?

Chandrashekhar Bawankule: बावनकुळेंच्या डोळ्यात पाणी! मनोज जरांगेंच्या टीकेमुळे भावुक; म्हणाले, माझंही कुटुंब आहे...

Vastu Tips: पाकिटात काय ठेवावे आणि काय ठेवू नये? वास्तुशास्त्राचे 'हे' उपाय दूर करू शकतात पैशांची अडचण!

Vaibhav Sooryavanshi : भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या वैभवला कसा रोखणार? हरभजनने सांगितलं गेमप्लॅन

SCROLL FOR NEXT