आधार रखडले; कर्जमाफी लांबली
राजापुरातील ३८६ शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ ः शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत राजापूर तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयीकृत बँकांमधील ७७५ शेतकरी पात्र ठरले आहेत. मात्र, त्यांपैकी निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडल्यामुळे त्यांना कर्जमुक्तीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत.
कर्जमाफीच्या पहिल्या यादीत तालुक्यातील ७७५ शेतकरी पात्र ठरले. यांपैकी ३९० कर्जदारांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. सहकार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे ३८६ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण प्रलंबित आहेत. त्यात ॲग्रीस्टॅक (फार्मर आयडी) नसलेली ९१ खाती आहेत. तसेच जमीन नावावर नसलेले १२३, मयत कर्जदार २०, देवस्थान व भोगवटदार वर्ग-२, ३ व खंडकरी चे २१, बायोमॅट्रीक कॅप्चर न होणारे १०, परगावी/स्थलांतरित झालेले सहा आणि इतर कारणे असलेले १२२ शेतकरी आहेत. शासकीय नियमांनुसार कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण अत्यंत अनिवार्य आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी निर्धारित कालावधीत आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन सहकार विभागातर्फे करण्यात आले आहे.
------
दृष्टिक्षेपात...
* कृषीपीक कर्जखाती ः ७७५
* आधार प्रमाणीकरण झालेली कर्जखाती ः ३९०
* आधार प्रमाणीकरण प्रलंबित असलेली कर्जखाती ः ३८६
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.