कोकण

राजापूरच्या सड्यांवर दुर्मिळ ‘कंदीलपुष्प’ फुलले

CD

rat१३p६.jpg ः
26O57036
सेरोपेजिया ओकुलाटा
rat१३p७.jpg ः
26O57037
सेरोपेजिया विंकाएफोलिया
rat१३p८.jpg ः
26O57038
सेरोपेजिया अटीन्युएटा
(छाया ः धनंजय मराठे, राजापूर)
-----
सकाळ विशेष---------लोगो

राजापूरच्या सड्यांवर दुर्मिळ ‘कंदीलपुष्प’ फुलले
सेरोपेजिया विंकाएफोलियाचे अस्तित्व धोक्यात ; जतन अन् संरक्षण गरजेचे
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ ः पश्‍चिम घाट परिसरात आढळणारी कंदीलपुष्प फुलवनस्पती श्रावण सरींमध्ये हिरव्यागार झालेल्या कोकणच्या डोंगररांगा अन् कातळसड्यांवर फुलली आहे. वैशिष्ट्यपूर्ण आकार आणि आकर्षक फूल म्हणून नावलौकीक असलेल्या या कंदीलपुष्पाने कोकणच्या जैवविविधतेमध्ये भर घालताना येथील निसर्गसौंदर्य अधिकच खुलवले आहे. काचेच्या पारंपरिक कंदिलासारखी किंवा मशालीसारखी दिसणाऱ्या या कंदीलपुष्पाच्या ‘सेरोपेजिया विंकाएफोलिया’ ही प्रजाती दुर्मिळ म्हणून ओळखली जात आहे. विविध कारणांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या या संकटग्रस्त ‘सेरोपेजिया विंकाएफोलिया’ या प्रजातीचा राजापूरमध्ये आढळ दिसून आल्याची माहिती कातळशिल्प संशोधक अन् सड्यांवरील रानफुले अभ्यासक धनंजय मराठे यांनी दिली.
बारमाही नसलेल्या कंदीलपुष्प वनस्पतीची वेल पावसाळ्यात जमिनीखालील कंदापासून वाढते. जुलै ते सप्टेंबरदरम्यान फुले येतात. वैशिष्ट्यपूर्ण असलेले कंदीलपुष्प साधारणतः तीन ते आठ सेमी लांब आणि पिवळसर रंगाचे असते. फुलांच्या रचनेतील नलिकेवर जांभळ्या रंगाचे पट्टे किंवा ठिपके असतात. फुलाच्या पाकळ्या वरच्या टोकाला एकमेकांना जोडलेल्या असल्याने आत एक रिकामी जागी वा पिंजऱ्यासारखी रचना तयार होते. कंदीलपुष्प या फूलवनस्पतीची फुले हुबेहूब काचेच्या पारंपरिक कंदिलासारखी किंवा मशालीसारखी दिसत असल्याने त्यांना ‘कंदीलपुष्प’ म्हटले जाते. अवाजवी मानवी हस्तक्षेप, जंगलतोड आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्यामुळे पश्‍चिम घाट आणि कोकणातील कातळसडे परिसरामध्ये दिसणाऱ्या या फूलवनस्पतीचे अस्तित्व धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. संकटग्रस्त म्हणून ओळखली जाणारी कंदीलपुष्पाच्या ‘सेरोपेजिया अटीन्युएटा, सेरोपेजिया ओकुलाटा, सेरोपेजिया विंकाएफोलिया’ या तीन प्रजातींपैकी ‘सेरोपेजिया विंकाएफोलिया’ ही प्रजाती राजापूर तालुक्याच्या काही मर्यादित अधिवासातच आढळून आल्याचे मराठे यांना सांगितले. निसर्गसाखळीमध्ये या प्रजातीचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. या प्रजातीचे संरक्षण होणे गरजेचे असल्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
---
वैशिष्यपूर्ण परागीकरण पद्धत
कंदीलपुष्पामध्ये कीटकांना तात्पुरते ट्रॅप करण्याची रंजक व्यवस्था आहे. फुलाच्या विशिष्ट गंधामुळे आकर्षित होऊन जेव्हा लहान माशा वा कीटक फुलांच्या नळीसारख्या भागात जातात तेव्हा ते आत अडकतात. कीटक आत धडपडत असताना त्यांच्या शरीराला परागकण चिकटतात. परागीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पाकळ्या सैल होतात आणि कीटक सुखरूप बाहेर पडतो.
---
कोट १
‘राजापूर तालुक्याच्या डोंगरदऱ्या, कातळसडे परिसरात भ्रमंती करत असताना कंदीलपुष्पाच्या सेरोपेजिया अटीन्युएटा, सेरोपेजिया ओकुलाटा, सेरोपेजिया विंकाएफोलिया या तीन प्रजातींपैकी सेरोपेजिया विंकाएफोलिया ही प्रजाती राजापूरच्या काही मर्यादित अधिवासात आढळून आली. दुर्मिळ अन् संकटग्रस्त प्रजातींचे अस्तित्व पर्यावरणीय समृद्धीचे द्योतक आहे.’
- धनंजय मराठे, अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

Mumbai News : चार महिने झाले... आई अजूनही दाराकडे पाहतेय; ‘अब्दुल’ कुठे आहे?

Latest Marathi News Live Update : स्वातंत्र्यदिनानिमित्त बीबी का मकबऱ्याला मनमोहक तिरंगी रोषणाई

Stray Dogs : भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर! ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र ‘डॉग शेल्टर’ उभारा

Shirur Market Committee Election : शिरूर बाजार समितीची निवडणूक तात्काळ घ्या; काँग्रेस पक्षाची मागणी

SCROLL FOR NEXT