कोकण

''नमो उद्यान'' वेंगुर्लेवासियांसाठी खुले

CD

swt1315.jpg
57080
वेगुर्ले : येथे साकारलेले नमो उद्यान.

‘नमो उद्यान’ वेंगुर्लेवासियांसाठी खुले
आकर्षणाचा केंद्रबिंदू : नाविन्यपूर्ण संकल्पनांसह ठरलेल्या वेळेत काम
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १३ : राज्याच्या उपक्रमांतर्गत येथील नगरपालिकेच्या वतीने साकारण्यात आलेले आकर्षक ‘नमो उद्यान’ नागरिकांसाठी खुले केले आहे. शासनाच्या निकषांनुसार अत्यंत कमी कालावधीत आणि पावसाळ्यातही हे उद्यान पूर्ण केले आहे. यामध्ये कोरॅकल राईड, सोलार बेंचेस, अत्याधुनिक ई-टॉयलेट, व्हर्टिकल गार्डनसह नाविन्यपूर्ण संकल्पना राबवल्या असून हे उद्यान आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
शासनाने ‘नमो उद्यान’ ही संकल्पना राबविताना प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायतीला उद्यान उभारण्यासाठी एक कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. निर्धारित कालावधीत उद्यान पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले. त्यानुसार येथील पालिकेने उपलब्ध जागेचा योग्य वापर करून आकर्षक, आधुनिक आणि नागरिकांना उपयुक्त असे नमो उद्यान साकारले आहे. उद्यानाची उभारणी करताना शासनाने निश्चित केलेल्या प्रत्येक निकषाचा बारकाईने विचार केला आहे. नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, अभियंते, अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित कंत्राटदार यांच्या समन्वयातून कमी कालावधीत हे काम पूर्ण करण्यात आले.
उद्यानाला लागूनच कायमस्वरुपी वाहणारा ओहोळ असून, यावर दरवर्षी सुमारे सात ते आठ बंधारे घालण्यात येतात. त्यामुळे नोव्हेंबर ते मे या कालावधीत येथे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण होतो. याचा उपयोग करून उद्यानात ‘कोरॅकल राईड’ ही अभिनव संकल्पना राबविली आहे.
ओहोळावरील बंधाऱ्यांमुळे पाण्याची पातळी वाढण्याबरोबरच परिसरातील विहिरींच्या पातळीलाही त्याचा फायदा होतो. आता याच पाणीसाठ्याचा उपयोग नागरिकांना जलसफरीचा अनोखा अनुभव देण्यासाठी केला जाणार आहे. शहरातील नागरिकांसाठी ही सुविधा विशेष आकर्षण ठरणार आहे. हिरवाईसोबत आरोग्य, विरंगुळा, मनोरंजन आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे हे उद्यान नागरिकांसाठी सर्वसमावेशक अनुभवाचे केंद्र ठरणार आहे.


चौकट
उद्यानातील आधुनिक सुविधा
सोलार बेंचेस — बसून वाचनाची सुविधा आणि मोबाईल चार्जिंगची सोय. वीजपुरवठा खंडित झाला तरी सोलार ऊर्जेवर सुविधा सुरू राहणार.
बायोमेट्रिक ई-टॉयलेट — विविध सेन्सर्सच्या माध्यमातून कार्य करणारे अत्याधुनिक ई-टॉयलेट.
सोलार पाण्याची व्यवस्था — सोलार ऊर्जेवर आधारित पिण्याच्या पाण्याची सुविधा.
सोलार लाईट्स — उद्यानाच्या परिसरात पर्यावरणपूरक प्रकाशव्यवस्था.
व्हर्टिकल गार्डन — कमी जागेत हिरवाई वाढविणारी आकर्षक संकल्पना.
एम्फी थिएटर — सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी खुली जागा.
योगाभ्यासासाठी स्वतंत्र जागा — नागरिकांना नियमित योगाभ्यास करता यावा यासाठी विशेष व्यवस्था.
योग केंद्र — आरोग्य आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणारी सुविधा.
ज्येष्ठ नागरिक कक्ष — ज्येष्ठांसाठी स्वतंत्र विरंगुळा व संवादाची जागा.
बांबू गॅझिबो — पूर्णपणे बांबूपासून तयार केलेली आकर्षक वास्तुरचना.
कलात्मक कंपाउंड — उद्यानाला वेगळे आणि आकर्षक स्वरूप देणारी कलात्मक रचना.

चौकट
कोकण विभागात स्पर्धेसाठी दावेदार
नमो उद्यानासाठी शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार काम पूर्ण करण्यात आले असून, प्रत्येक निकषातील गुणांचा विचार करून रचना केली आहे. यामुळे नमो उद्यानाच्या स्पर्धेत निर्धारित निकषांनुसार येथील पालिका कोकण विभागात अव्वल ठरेल, असा विश्वास प्रशासनातर्फे व्यक्त होत आहे. लवकरच पालकमंत्री नीतेश राणे आणि माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत उद्यानाचा अधिकृत उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले.

चौकट
‘भारत माता’ शिल्प ठरतेय आकर्षण
उद्यानात साकारण्यात आलेले ''भारत माता'' शिल्प हे विशेष आकर्षण आहे. पृथ्वी हातावर घेतलेली भारत माता आणि पृथ्वीवर गंगेच्या पाण्याचे प्रतीकात्मक दर्शन घडविणारी ही संकल्पना आगळीवेगळी आहे. याशिवाय नदीतील पाणी वर येऊन पुन्हा खाली वाहत असल्याचा आभास निर्माण करणारा आकर्षक जलाशयही येथे साकारण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenakshi Shinde: ‘नाव घेतल्याने कोणी आरोपी ठरत नाही : मीनाक्षी शिंदे; ‘तपास होऊ द्या, सत्य बाहेर येईल’ शिंदेंचा पलटवार

Dino Morea: राहत्या घरातून डिनो मोरियाला अटक! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणाने अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या

ST NCMC Card: तिकिटाचे पैसे कटल्यानंतर पुन्हा ६० रुपये गायब;एनसीएमसी कार्डचा पहिल्याच दिवशी फटका, ज्येष्ठाची तक्रार

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील गुंडगिरीला अमित शहा जबाबदार- संजय राऊत

Ravikiran Ingawale : 'शरद कोराणे यांना कारागृहात इंजेक्शन देऊन संपवलं...'; रविकिरण इंगवलेंच्या व्हायरल ऑडिओमुळे खळबळ, कोराणे कुटुंबाची सखोल चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT