कोकण

‘नशा मुक्त भारत’ची १८ ला राष्ट्रीय ई-शपथ

CD

‘नशा मुक्त भारत’ची
उद्या राष्ट्रीय ई-शपथ

ओरोस, ता. १६ : ‘अमली पदार्थांच्या विळख्यापासून तरुणाईला दूर ठेवत व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘नशा मुक्त भारत अभियान’च्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी (ता. १८) अमली पदार्थांच्या गैरवापराविरोधात राष्ट्रीय ई-शपथ घेण्यात येणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी ‘एनएमबीए’ पोर्टलवर ‘नशामुक्त मित्र’ म्हणून नोंदणी करून राष्ट्रीय ई-शपथ घ्यावी,’ असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या निर्देशानुसार देशभर ‘नशामुक्त भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. तरुणांसह समाजातील विविध घटकांमध्ये अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे, नागरिकांना व्यसनापासून दूर ठेवणे आणि नशामुक्त समाजनिर्मितीला चालना देणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. अभियानाच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी ‘एनएमबीए’वर ‘नशामुक्त मित्र’ म्हणून नोंदणी करावी, तसेच ‘National Pledge Against Drug Abuse’ ही ई-शपथ घेऊन अमली पदार्थांविरोधातील अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अमली पदार्थांच्या व्यसनासंदर्भात मार्गदर्शन किंवा मदतीची आवश्यकता असल्यास १४४४६ या हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, Test : एकदिवस आधी रिटायर्ड हर्ट झाला, दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरला... पण KL राहुलचं शतक थोडक्यात हुकलं!

Pune Restrictions: महत्त्वाची बातमी! पुण्यात १८ ते ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी; कोणत्या गोष्टींवर असणार बंदी अन् का? जाणून घ्या...

Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

Nagpur Police Endlife: नागपूरमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाची साडीने गळफास घेऊन जीवन संपविले; पोलिस दलात खळबळ, कारणांचा तपास सुरू

LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

SCROLL FOR NEXT