कोकण

‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’बाबत आवाहन

CD

‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’बाबत आवाहन
ओरोस : उच्च शिक्षण घेत असताना शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ राबविण्यात येत आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १२ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या योजनेत भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या आणि शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांचा समावेश केला आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात बारावीनंतर पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेसाठी १२ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह अर्जाची एक प्रत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सिंधुदुर्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे जमा करावी. पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत ऑनलाइन अर्ज करून ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’चा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT