कोकण

मोबाईलवरून नोंदवा खताची मागणी

CD

57306

मोबाईलवरून नोंदवा खताची मागणी

डिजिटल प्रणाली; २० ऑगस्टपासून ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १४ : खतासाठी दुकानासमोर रांगेत उभे राहणे, साठा आहे की नाही याची चौकशी करणे आणि खत मिळेल की नाही याची चिंता करणे आता कमी होणार आहे. शेतकऱ्यांना अनुदानित रासायनिक खते वेळेवर, वाजवी दरात आणि सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाचा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ हा डिजिटल प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० ऑगस्टपासून लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीत मोबाईलवर खताची मागणी नोंदवल्यानंतर संबंधित कृषी सेवा केंद्रातील खतसाठा शेतकऱ्याच्या नावावर तीन दिवस राखीव ठेवला जाणार आहे.
या डिजिटल व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना मोबाईलवरूनच खताची मागणी नोंदविता येणार आहे. जवळच्या परवानाधारक विक्रेत्याकडे कोणते खत किती प्रमाणात उपलब्ध आहे, याची माहितीही घरबसल्या मिळणार आहे. त्यामुळे अनधिकृत साठेबाजी, कृत्रिम तुटवडा आणि खत खरेदीसाठी होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
शेतकऱ्यांनी मोबाईलमधील Google Play Store वरून ‘Framework for Fertilizer Sale’ ॲप डाउनलोड करून नोंदणी करावी. नोंदणीवेळी राज्याची निवड केल्यानंतर आधार क्रमांक आणि मोबाईलवर प्राप्त होणाऱ्या OTPच्या माध्यमातून पडताळणी करावी लागेल.
त्यानंतर स्वतःच्या किंवा संयुक्त मालकीच्या जमिनीची माहिती, पिकांचा हंगाम तसेच शासकीय शिफारशीनुसार आवश्यक असलेल्या खतांच्या पिशव्यांची संख्या नोंदविता येईल. त्यानंतर जवळच्या परवानाधारक खत विक्रेत्याची निवड करून खताची मागणी नोंदविता येणार आहे.
----------
प्रतिनिधीलाही घेता येणार खत
शेतकरी स्वतः खत घेण्यासाठी जाऊ शकत नसल्यास त्याच्या वतीने प्रतिनिधीलाही खत खरेदी करता येणार आहे. त्यासाठी अॅपमध्ये संबंधित प्रतिनिधीची माहिती, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाची पडताळणी करावी लागेल. खताची मागणी नोंदविल्यानंतर शेतकऱ्याला अॅपवर क्यूआर कोड आणि टोकन क्रमांक मिळेल. हा क्यूआर कोड सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. मागणी केलेला खतसाठा संबंधित कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्याच्या नावाने तीन दिवस राखीव राहील. या कालावधीत शेतकऱ्याने आपल्या सोयीनुसार दुकानात जाऊन क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर खत आणि त्याची पावती प्राप्त करून घ्यावी.
-------
कोट
या प्रणालीमुळे संबंधित दुकानात खत उपलब्ध आहे की नाही, हे घरबसल्या समजणार असल्याने शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे. खतासाठी दुकानांसमोर लांब रांगेत उभे राहण्याची गरजही कमी होणार आहे. डिजिटल नोंदणीमुळे खत वितरण अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. ॲपचा वापर करताना किंवा खत खरेदी प्रक्रियेत कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
- कृषी विभाग, सिंधुदुर्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: जंतर-मंतर आंदोलनानंतर आता शाळांवर अभिजीत दिपकेंचा फोकस! शाळा सुधारा अभियान राबवणार; 'या' जिल्ह्यातून शुभारंभ होणार

‘तुम्ही बीवी पगलू आहात?’ KBC 18 मध्ये अमिताभ बच्चन यांना थेट सवाल; म्हणाले, ‘मी जयाचा...’

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

SCROLL FOR NEXT