कोकण

पाळणेकोंड धरण तुडुंब, नगराध्यक्षांकडून जलपूजन

CD

57252

पाळणेकोंड धरण तुडुंब,
नगराध्यक्षांकडून जलपूजन
सावंतवाडी : ​​मुसळधार पावसामुळे नगरपालिकेचे कुणकेरी येथील पाळणेकोंड धरण तुडूंब भरुन वाहू लागले आहेत. या पाळणे कोंड धरणाला आज नगरध्यक्षा श्रद्धा सावंत-भोंसले यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. धरणातील वाढत्या जलसाठ्याचे स्वागत करत आणि भविष्यात परिसराला समृद्धी लाभावी, या प्रेरणेने नगरध्यक्षांच्या हस्ते जलपूजन करून धरणात नारळ अर्पण केला. पावसाचा जोर वाढल्यामुळे पाळणे कोंड धरणाची पाणीपातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे. सावंतवाडीतील नागरिकांना भेडसावणारी पाण्याची टंचाई दूर होण्यास यामुळे मोठी मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगरध्यक्षांनी अधिकाऱ्यांसह धरणाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि पाण्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी नियोजन सभापती आनंद नेवगी, आरोग्य सभापती सुधीर अडीवरेकर, पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, सुकन्या टोपले, सिद्धार्थ भांबुरे, अधिकारी प्राजक्ता कांबळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: मोठी बातमी! पुण्यातील प्रसिद्ध 'बर्गर किंग'वर FDAची कारवाई; 'झेप्टो'लाही तुकाराम मुंढेंचा दणका

Service Medals: वीरता-सेवा पदकांची घोषणा! CRPF ला सर्वाधिक पदकं; देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानांचा सन्मान

अखेर जेठालाल- बबिताचं लग्न झालं! दयाबेनने वाढलं जेवण; दिग्दर्शकाला नाही जमलं ते AI ने करून दाखवलं; व्हिडिओ होतोय व्हायरल

Vastu Tips: उशीखाली किंवा बेडवर औषधं ठेवताय? वास्तूमध्ये का मानले जाते अशुभ? जाणून घ्या नियम!

पाकिस्तान, श्रीलंका ते अमेरिका... जगभरातील लोक भारताकडे कसं बघतात? सर्वात मोठा सर्व्हे समोर

SCROLL FOR NEXT