‘त्या’ प्रकल्पांची चौकशी
करा ः डॉ. परुळेकर
सावंतवाडी, ता. १४ : सासोली (ता. दोडामार्ग) येथील एका प्रकल्पाचा मुद्दा, स्थानिकांची झालेली फसवणूक आणि बेसुमार वृक्षतोडीचे प्रकरण माजी मंत्री जयंत पाटील यांनी विधिमंडळात उपस्थित केल्यानंतर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कंपनीच्या जिल्ह्यातील सर्वच संशयास्पद प्रकल्पांची कडक चौकशी करून त्यावर तत्काळ स्थगिती आणण्याची मागणी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.
सासोली येथे सामाईक जमिनीवर बेकायदा ताबा मिळवून प्रकल्प होत असल्याचा आरोप तेथील ग्रामस्थांनी केला. परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. यात केवळ महसूल क्षेत्रातच नव्हे तर लगतच्या वनक्षेत्रातही झाडे तोडल्याप्रकरणी संबंधितांना दंड आकारण्यात आला आहे. हे सर्व करण्याचे धाडस संबंधितांकडे आले कोठून असा सवाल डॉ. परुळेकर यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यातील स्थानिक जमीन दलाल, सत्ताधारी पक्षाचे काही पदाधिकारी आणि महसूल व वन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आर्थिक संगनमतामुळेच हे धाडस शक्य झाले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
केवळ सासोलीच नव्हे तर संबंधितांचे हे जाळे जिल्ह्यात इतर ठिकाणीही पसरले आहे. तिलारी बॅकवॉटरला लागून असलेल्या पाट्ये गावात स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता तेथेही असेच प्रकार सुरू आहे. जिल्ह्याच्या इतर भागातही पर्यावरणावर आघात करून असे घातक प्रकल्प लादले जात आहेत. सासोलीतील ग्रामस्थ गेल्या दोन-अडीच वर्षांपासून न्यायासाठी संघर्ष करत आहेत, परंतु त्यांना जागोजागी दहशत आणि बळजबरीचा सामना करावा लागत आहे. हजारो कोटींचा नफा कमावणाऱ्या या बड्या प्रकल्पांसमोर स्थानिक प्रशासन पूर्णपणे हतबल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे सासोलीसह जिल्ह्यातील सर्वच आरोप असलेल्या बांधकाम प्रकल्पांना तात्काळ स्थगिती देऊन, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकातून केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.