कोकण

‘श्री देव बांदेश्वर मंदिराबाहेर वॉटरप्रूफ सीसीटीव्ही बसवा’

CD

‘श्री देव बांदेश्वर मंदिराबाहेर
वॉटरप्रूफ सीसीटीव्ही बसवा’

डिजिटल डिस्प्लेद्वारे दर्शन व्यवस्थेचीही मागणी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १४ : येथील जागृत देवस्थान आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव बांदेश्वर मंदिरातील साडेअकरा लिंगाचे दर्शन भाविकांना सुलभरीत्या व्हावे, यासाठी मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर वॉटरप्रूफ सीसीटीव्ही कॅमेरा बसवावेत. तसेच डिजिटल डिस्प्लेद्वारे दर्शनाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी बांदा गावातील व्यापारी वर्ग, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात श्री देव बांदेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीच्या अध्यक्ष व सचिवांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, श्री देव बांदेश्वर देवस्थान हे बांदा गावातील जागृत देवस्थान असून गावातील तसेच परिसरातील नागरिकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. देवस्थानातील साऊंडकरा लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. या लिंगाचे दर्शन भाविकांसाठी अतिदुर्लभ असल्याने त्याच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह नव्या पिढीमध्येही मोठी उत्सुकता आहे. मात्र,साडे अकरा लिंग असलेल्या गाभाऱ्यात वॉटरप्रूफ सीसीटीव्ही कॅमेरा बसवून मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर डिजिटल डिस्प्ले लावल्यास भाविकांना त्या लिंगांचे दर्शन सहज उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या सुविधेमुळे बांदा गावातील धार्मिक पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. बाहेरील पर्यटक व भाविकांची संख्या वाढल्यास स्थानिक बाजारपेठेला त्याचा फायदा होऊन व्यापार-व्यवसायात वाढ होईल. तसेच बेरोजगार युवकांनाही रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून श्री देव बांदेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात वॉटरप्रूफ सीसीटीव्ही कॅमेरा व बाहेर डिजिटल डिस्प्ले बसविण्याबाबत देवस्थान समितीने लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी विनंती केली आहे. या निवेदनावर राजेंद्र मधुकर केसरकर यांच्यासह बांदा व बांदा पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सुमारे १०७ नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा! ध्वजारोहणापासून भाषणापर्यंत... १५ ऑगस्टला काय-काय घडणार? वाचा मिनिट-टू-मिनिट वेळापत्रक

Laxman Hake: आता बस झालं..आम्ही हरलो आहोत! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय

R. Ashwin: अश्विन क्रिकेटवर बोलत होता अन् अचानक घराबाहेर पोलीस आले; फोन उचलताच समोर आलं ‘ते’ कारण...

Nag Panchami 2026: भावासाठी उपवास,जमीन न खोदणे ते चुलीचा नियम; जाणून घ्या नागपंचमीला पाळल्या जाणाऱ्या प्रथा!

Marathi News Live Updates : टीएमसीच्या माजी आमदारावर जमावाचा संताप; कोर्टात नेत असताना फेकली अंडी

SCROLL FOR NEXT