जानवळे उपसरपंच
जानवळकरांचा राजीनामा
गुहागर, ता. १४ ः तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच वैभवी जानवळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा ग्रामविकास अधिकारी सोनवणे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. ठरलेला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर दिलेल्या शब्दाचे पालन करत त्यांनी स्वखुशीने राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
जानवळे ग्रामपंचायतीत २०१७ मध्ये मनसेने खाते उघडले होते. त्यानंतर २०२१च्या उपसरपंच निवडणुकीत जानवळकर यांचा अवघ्या एकामताने पराभव झाला होता; मात्र, २०२२च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या पुन्हा सदस्य म्हणून निवडून आल्या. पुढे १ ऑक्टोबर २०२४ रोजी ग्रामस्थ व सदस्यांच्या आग्रहास्तव आणि एकजुटीने जानवळकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. आपल्या कार्यकाळात जानवळकर यांनी अनेक सामाजिक व नागरी विकासकामे मार्गी लावली. कोरोना काळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना ''शीतल राजे फाउंडेशन'' आणि ''कोकण फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट'' चिपळूण यांच्यावतीने ''कोविड योद्धा'' पुरस्काराने सन्मानितही केले होते. ग्रामस्थ आणि सदस्यांनी ज्या विश्वासाने ही जबाबदारी सोपवली होती तो विश्वास सार्थ ठरवत ठरलेला कालावधी संपताच त्यांनी राजीनामा दिला. आपल्या पदाच्या कार्यकाळात गावकऱ्यांचे मिळालेले सहकार्य मोलाचे ठरल्याची भावना जानवळकर यांनी या वेळी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.