rat14p10.jpg-
57269
दापोलीः येथील नगरपंचायतीचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी महेश धुमाळ यांचे स्वागत करताना नगराध्यक्षा कृपा घाग व सर्व नगरसेवक.
दापोली नगरपंचायत मुख्याधिकारीपदी महेश धुमाळ
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १४ ः गेल्या काही वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर चालणाऱ्या दापोली नगरपंचायतीला अखेर कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाले आहेत. महेश धुमाळ यांनी मुख्याधिकारीपदाचा पदभार स्वीकारला असून, नगरपंचायतीच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या नियुक्तीमुळे शहरातील रखडलेल्या विकासकामांना गती मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी दापोली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार खेडचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याकडे होता. त्यामुळे प्रशासकीय कामकाजासह शहरातील विकासकामांवर विपरित परिणाम होत होता. वाढत्या नागरी समस्या लक्षात घेता कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा, अशी सातत्यपूर्ण मागणी नागरिक व लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. धुमाळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षा कृपा घाग, नगरसेवक विलास शिगवण, रवींद्र क्षीरसागर, अन्वर रखांगे, मेहबूब तळघरकर, नगरसेविका प्रिती शिर्के, साधना बोत्रे, शिवानी खानविलकर, रिया सावंत तसेच नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. नवीन मुख्याधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होईल तसेच लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या समन्वयातून दापोलीच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.