कोकण

संगमेश्वर ः शासकीय निवासस्थानांची दूरवस्था

CD

rat14p7.jpg-
57229
संगमेश्वर ः शासकीय निवासस्थानांची स्थिती.
-----------
संगमेश्वरात शासकीय निवासस्थानांची दुरवस्था
खासगी घरांचा आधार; दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
देवरूख, ता. १४ ः संगमेश्वर तालुक्यात विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी उभारलेली शासकीय निवासस्थाने सध्या देखभालीअभावी अत्यंत बिकट आणि भग्नावस्थेत पोहोचली आहेत. अनेक इमारतींची मोठी पडझड झाली असून, परिसरात झाडेझुडपे उगवली आहेत. त्यामुळे हक्काचे घर असूनही अधिकारी व कर्मचाऱ्यांना खासगी जागा शोधण्याची वेळ आली आहे.
संगमेश्वर पंचायत समिती गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या इमारतींची दुरूस्ती न झाल्याने वापराविना पडून आहेत. तालुक्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी असलेल्या तहसीलदारांच्या शासकीय बंगल्याचीही मोठी दुरवस्था झाली आहे. तसचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वसाहतीकडे दुर्लक्ष झाल्याने सुरक्षित निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या शासकीय मालमत्तेची वेळेत देखभाल न झाल्यास ती पूर्णपणे निकामी होण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रशासनाने नवीन इमारती उभारण्यासोबतच सध्याच्या निवासस्थानांची तातडीने दुरूस्ती व देखभाल करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

चौकट
आराखडा बनवण्यास आरंभ
पंचायत समितीच्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानांच्या जागेवर नवीन निवासस्थाने उभारण्याच्यादृष्टीने आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. याबाबत पंचायत समितीचे उपसभापती प्रफुल्ल बाईत म्हणाले, पंचायत समितीच्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी असलेल्या जागेवर नवीन निवासस्थाने उभारण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच हा प्रस्ताव आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. नवीन निवासस्थाने उभारल्यास बाहेरून येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

चौकट
या इमारतींची दुरवस्था
* गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी निवास
* पंचायत समितीतील इतर कर्मचाऱ्यांसाठीची इमारत
* तहसीलदारांचा शासकीय बंगला
* पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची वसाहत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: आता बस झालं..आम्ही हरलो आहोत! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय

रश्मिका मंदानाने पहिल्यांदाच दाखवलं तिचं मंगळसूत्र; इतकं साधं अन् सुंदर की जान्हवीचं मंगळसूत्रही विसराल!

Stray Dog Attack : आईसोबत चाललेल्या मुलावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला; प्रसंगावधान राखून आईने स्वतःच्या अंगावर हल्ला झेलत मुलाचे प्राण वाचवले, झटापटीत आई गंभीर जखमी

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Abhijeet Dipke: जंतर-मंतर आंदोलनानंतर आता शाळांवर अभिजीत दिपकेंचा फोकस! शाळा सुधारा अभियान राबवणार; 'या' जिल्ह्यातून शुभारंभ होणार

SCROLL FOR NEXT