कोकण

अखंड भारताचे स्वप्न प्रत्येकाचे

CD

57284
कासार्डे ः येथील भाजपच्या तिरंगा रॅलीमध्ये खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे सहभागी झाले.

57285
कासार्डे ः येथील तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.


अखंड भारताचे स्वप्न प्रत्येकाचे

पालकमंत्री राणेंना विश्वास; कासार्डेत तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा जागर


सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर तिरंगा यात्रांचे आयोजन होत आहे. अखंड भारताचे स्वप्न प्रत्येक भारतीयाने पाहिले आहे. हे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता आणि धमक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आहे, असा विश्वास पालकमंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या अभियानांतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघाची तिरंगा रॅली कासार्डे तिठा ते तळेरे बसस्थानकापर्यंत काढण्यात आली. खासदार नारायण राणे, पालकमंत्री राणे यांच्यासह हातात तिरंगा घेऊन शेकडो नागरिक, विद्यार्थी, माजी सैनिक तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. या परिसरातील शाळांतील विद्यार्थीही तिरंगा हातात घेऊन या रॅलीत सहभागी झाले होते.
या रॅलीत माजी आमदार अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, मनोज रावराणे, सुप्रिया मेस्त्री, पंढरी वायंगणकर, विशाल कामत, संतोष गुरव, सुरेंद्र कोदे, सर्वेश दळवी, सागर राणे, सचिन पारधिये, दीपक मेस्त्री, प्रदीप गावडे, किशोर राणे, राकेश राणे, रविराज मोरजकर, स्वप्निल चिंदरकर, प्रकाश पारकर, महेश सावंत, संदीप साटम, नितीन गावकर, चारू साटम, बाबू गायकवाड, संजय कामतेकर, दादू राणे, संदीप सावंत, समीर सावंत, पप्पू पुजारे, शिवा राणे, प्रभाकर राणे, सुभाष मालंडकर, सावी लोके, मेघा गांगण यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
‘वंदे मातरम्’ म्हटलेच पाहिजे!
रॅलीच्या सांगता कार्यक्रमात बोलताना मंत्री राणे म्हणाले की, ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ म्हणताना प्रत्येकाच्या मनात देशाबद्दलचा अभिमान जागृत झाला पाहिजे. राष्ट्रगीत किंवा ‘वंदे मातरम्’ म्हणण्यावरून काही जण गोंधळ घालत आहेत. मात्र, ही बाब चुकीची आहे. प्रत्येक भारतीयाने ‘वंदे मातरम्’ म्हटले पाहिजे आणि त्याचा सन्मान राखला पाहिजे. ‘वंदे मातरम्’चा अपमान करणाऱ्यांविरोधात भारतीय म्हणून प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: जंतर-मंतर आंदोलनानंतर आता शाळांवर अभिजीत दिपकेंचा फोकस! शाळा सुधारा अभियान राबवणार; 'या' जिल्ह्यातून शुभारंभ होणार

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

‘तुम्ही बीवी पगलू आहात?’ KBC 18 मध्ये अमिताभ बच्चन यांना थेट सवाल; म्हणाले, ‘मी जयाचा...’

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

SCROLL FOR NEXT