कोकण

गावतळे ः गणशोत्सवापूर्वीच खासगी ट्रॅव्हल्सची भरमसाठ भाडेवाढ

CD

खासगी ट्रॅव्हल्सचा दरवाढीचा दणका
चाकरमान्यांची ओढाताण; गणशोत्सवापूर्वीच ३०० रुपये वाढवल्याने नाराजी
सकाळ वृत्तसेवा
गावतळे, ता. १४ ः गौरी-गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वीच खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी केलेल्या भाडेवाढीमुळे मुंबईहून दापोलीसह कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. ऐन सणाच्या तोंडावर गणेशभक्तांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रत्येक तिकिटामागे तब्बल ३०० रुपये वाढवल्याने चाकरमान्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. एकाच घरातील चार ते पाच जण कोकणातील घरी यायची झाल्यास येण्या-जाण्याचा खर्चच दहा हजाराच्या घरात जात आहे.
१४ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. त्यासाठी कोकण रेल्वे, एसटी हाऊसफुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे आता चाकरमानी खासगी आरामबसच्या तिकिटासाठी प्रयत्न करत आहेत; मात्र खासगी आरामबसच्या तिकीटदरात वाढ झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोकणातील बहुतांशी चाकरमानी हे उदरनिर्वासाठी मुंबईत ये-जा करत असतात; मात्र गौरी गणपती व होळीच्या सणाला ते आवर्जून गावी येतात. कोकणचा सर्वात मोठा आणि जिव्हाळ्याचा सण म्हणजे गौरी-गणपती. वर्षभर मुंबईत कष्ट करणारा चाकरमानी या सणाची चातकासारखी वाट पाहत असतो; मात्र, यंदा गावी जाणाऱ्या-येणाऱ्या सामान्य मध्यमवर्गीय चाकरमान्यांसमोर महागाई आणि अचानक झालेल्या भाडेवाढीचे मोठे संकट उभे राहिले आहे.
मुंबईहून रत्नागिरीकडे येण्यासाठी गणेशोत्सव काळातील दर अव्वाच्या सव्वा वाढवले जातात; मात्र प्रवासात अडचणी येऊ नयेत यासाठी अनेकवेळा अधिकचे तिकीट काढून कोकणवासीय गावाकडे परततात. तसेच गणेशोत्सव झाल्यानंतर ते माघारी जातात. सध्या कोकण रेल्वे आणि एसटी प्रशासनाने जादा गाड्यांचे नियोजन केले आहे; परंतु यातील बहुसंख्य गाड्या फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे अनेकाना खासगी गाड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

चौकट
57307
तिकीटदर ९०० रुपयांवर
पूर्वी ६०० रुपये असलेले तिकीट आता थेट ९०० रुपयांवर पोहोचले आहे. प्रत्येक तिकिटामागे ३०० रुपयांची वाढ केली आहे. मुंबईत महिना १० ते १५ हजार रुपयांवर काम करणाऱ्या चाकरमान्यांना ४-५ जणांच्या कुटुंबासह गावी जाण्या-येण्यासाठीच १० ते १२ हजार रुपये खर्च करावे लागत आहेत.

चौकट
चाकरमानी अडकले कात्रीत
चाकरमान्यांचा पगाराचा जवळपास अर्धा हिस्सा जर प्रवासातच संपला तर गावी जाऊन सणाची खरेदी, पूजा आणि इतर खर्च कसा करायचा? हा प्रश्न मुंबईकरांसमोर पडलेला आहे. ७ ते ८ दिवसांच्या सुट्ट्या घेतल्यामुळे बहुतांश खासगी कंपन्या किंवा आस्थापनांमध्ये चाकरमान्यांचा तेवढ्या दिवसांचा पगार कापला जातो. एकीकडे वाढीव तिकिटाचा खर्च आणि दुसरीकडे कापला जाणारा पगार, अशा दुहेरी कात्रीत चाकरमानी सापडला आहे.

कोट
खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकही बहुतांश कोकणातीलच आहेत. त्यामुळे त्यांनी सणासुदीच्या काळात नफाखोरी न करता सहकार्याची भावना दाखवावी आणि भाडेवाढ कमी करून चाकरमान्यांना दिलासा द्यावा.
- ममता शिंदे, माजी सभापती आणि कोळबांदे गण सदस्य, दापोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: जंतर-मंतर आंदोलनानंतर आता शाळांवर अभिजीत दिपकेंचा फोकस! शाळा सुधारा अभियान राबवणार; 'या' जिल्ह्यातून शुभारंभ होणार

‘तुम्ही बीवी पगलू आहात?’ KBC 18 मध्ये अमिताभ बच्चन यांना थेट सवाल; म्हणाले, ‘मी जयाचा...’

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

SCROLL FOR NEXT