शृंगारतळी विभाग
प्रमुखपदी लांजेकर
गुहागर ः तालुक्यातील शृंगारतळी जिल्हा परिषद गटाच्या विभाग प्रमुखपदी अतुल लांजेकर यांची नियुक्ती केल्याचे आमदार भास्कर जाधव यांनी जाहीर केले. लांजेकर यांचा जनसंपर्क दांडका असून, संघटनावाढीसाठी त्यांचे महत्वाचे योगदान आहे. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोचवणे आणि पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचे काम आपल्या हातून घडो, अशा शुभेच्छा आमदार जाधव यांनी दिल्या. या वेळी जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख सचिन बाईत, ज्येष्ठ शिवसैनिक विनायक मुळ्ये, खेड तालुकाप्रमुख अंकुश काते, सरपंच शैलेश साळवी, समीक्षा बारगुडे, मंगेश सोलकर, जयदेव मोरे, साक्षी चव्हाण, मधुकर सावंत यांच्यासह शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.
-------
‘माय भारत पोर्टलचा
लाभ युवकांनी घ्यावा’
रत्नागिरी ः माय भारत युवा कार्यक्रम तथा क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या माय भारत या पोर्टलचा जिल्ह्यातील युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले. माय भारत जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत जिल्हा युवा समन्वयक स्वप्नील देशमुख यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी म्हणाले, युवकांना प्रगल्भ करणे, त्यांना विकसित करणे त्यासाठी माय भारत हा एक प्लॅटफॉर्म आहे. विधायक कामकाजासाठी समाजात सकारात्मक संदेश पोहोचवण्यासाठी सर्वांनी याचा वापर करूया. शासकीय कार्यक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभाग हवा यासाठी माय भारतचा सुयोग्य पद्धतीने सर्वांनी वापर करावा. जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवण्यासाठी माय भारतचे सहकार्य घ्यावे. या बैठकीला दर्शन कानसे, संकेत कदम, विजय शिंदे आदी उपस्थित होते.
--------
बीएसएनएलची
ग्राहकांसाठी सवलत
रत्नागिरी ः भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सरकारी टेलिकॉम कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) ग्राहकांसाठी अत्यंत आकर्षक आणि धमाकेदार ऑफर्सची घोषणाच केली आहे. खासगी कंपन्यांच्या वाढत्या रिचार्ज दरांच्या पार्श्वभूमीवर, बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना दिलासा देत मोबाईल, ब्रॉडबँड आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.