57290
तिरंगा यात्रेतून वेंगुर्लेत राष्ट्रप्रेमाचा जागर
वेंगुर्ले, ता. १४ : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय, भारत सरकारच्या युवा भारत सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या वतीने आयोजित सायकल आणि तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या यात्रेत सुमारे दोनशे व्यक्तींनी सहभाग नोंदविला.
हातात तिरंगा आणि सायकलींवर राष्ट्रध्वज घेऊन विद्यार्थी, युवक तसेच नागरिक मोठ्या उत्साहात या यात्रेत सहभागी झाले. भारतमातेचा जयघोष, देशभक्तीपर घोषणा आणि डौलाने फडकणाऱ्या तिरंग्यामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला. यावेळी वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सचिन परुळकर म्हणाले, ‘‘तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नाही, तर तो आपल्या स्वातंत्र्याचा, त्यागाचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा गौरवशाली प्रतीक आहे. विद्यार्थ्यांच्या मनात लहान वयापासूनच राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रध्वजाबद्दल आदराची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. सायकल आणि तिरंगा यात्रेच्या माध्यमातून ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार प्रत्येकाच्या मनात रुजविण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’
‘हर घर तिरंगा’ या भावनेला बळ देत सायकल आणि तिरंगा यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शिस्तबद्ध सहभाग हे या यात्रेचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ, वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सचिन परुळकर, श्री शिवाजी हायस्कूल, तुळसचे मुख्याध्यापक विनायक कोल्हे संदीप तुळसकर, डॉ. गोविंद धुरी, बबन घोडे-पाटील, संदीप पेडणेकर, सर्पमित्र महेश राऊळ, माजी पोलीस अधिकारी सुधीर चुडजी, संजना तुळसकर, धनश्री तुळसकर, प्रज्वल परुळकर तसेच उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे चे रावे उपक्रमाचे विद्यार्थी ओम कुंभार, अमित टोकसिया, अरीन मोंडे, सिद्धार्थ चौधरी, धनंजय साळवी, दिनेश बिश्नोई, यशराज पाटील विद्यार्थी आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रध्वजाबद्दल आदर, देशाविषयी अभिमान आणि ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना रुजविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.