57291
आरोंदा सातेरी भद्रकाली मंदिरात
सामुदायिक पारायणास सुरुवात
आरोंदा, ता. १४ : श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, आरोंदा यांच्या वतीने श्रावण मासानिमित्त आरोंदा येथील सातेरी भद्रकाली मंदिरात दर गुरुवारी ‘स्वामी सारामृत’ २१ अध्याय पोथीचे सामुदायिक पारायण आयोजित केले आहे. या उपक्रमाचा प्रारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. पहिल्याच सामुदायिक पारायणाला परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. भक्तिमय वातावरणात पारायण सोहळा संपन्न झाला. श्रावण मासातील प्रत्येक गुरुवारी ‘स्वामी सारामृत’ २१ अध्याय पोथीचे सामुदायिक पारायण करण्यात येणार आहे. या धार्मिक उपक्रमात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, आरोंदा यांच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सुमन पोखरे व कांचन कोचरेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.