कोकण

रत्नागिरी- आदित्य गजमल, वेदिका जगदाळे ठरले वेगवान धावपटू

CD

rat१४p९.jpg-
५७२४५
डेरवण ः येथील क्रीडासंकुलात आयोजित धावण्याच्या स्पर्धेत सहभागी खेळाडू.

आदित्य गजमल, वेदिका जगदाळे वेगवान धावपटू
जिल्हा अजिंक्यपद मैदानी स्पर्धा ; राज्यस्तरीयसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत १६ वर्षाखालील गटात आदित्य गजमल आणि वेदिका जगदाळे वेगवान धावपटू ठरले. तर १४ वर्षाखालील गटात ट्रायथलॉन स्पर्धेचे विजेतेपद आदित्य गजमल, अनुष्का राणीम, अथर्व पवार, आर्या भुवड, वेदांत वाघे, चिन्मयी शिगवण या खेळाडूंनी पटकावले.
एसव्हीजेसीटी क्रीडा अॅकॅडमी, डेरवण, चिपळूण येथे ९ ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत २५० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. प्रथम तीन क्रमांकाच्या खेळाडूना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत पहिल्या दोन क्रमांकाचे खेळाडू २७ ते ३० ऑगस्ट या कालावधीत डेरवण येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. सर्व पदक विजेत्या व राज्य स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील खेळाडूंचे रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, उपाध्यक्ष श्रीकांत पराडकर, सचिव संदीप तावडे, प्रशिक्षक अविनाश पवार, सैफन चरके, सुहास चव्हाण, संतोष शिर्के यांनी अभिनंदन केले.
या स्पर्धेचा निकाल ः १४ वर्षाखालील मुले व मुली ट्रायथलॉन ए - यश शिगवण, हर्षित सार्दळ, आर्यन गुरव, अनुष्का राणी, संस्कृती घुमे, वीणा शिंदे. ट्रायथलॉन बी- अथर्व पवार, सार्थक सुतार, प्रणव यादव, आर्या भुवड, दुर्गा गुरव, श्रुती पळसमकर. ट्रायथलॉन सी - वेदांत वाघे, क्षितिज जुवळे, स्वराज यादव, चिन्मयी शिगवण, सौम्या सरफरे, शुभरा सरफरे.
१६ वर्षाखालील मुले ६० मीटर धावणे ः आदित्य गजमल, पवन शिगवण, नैतिक कदम, ६०० मीटर धावणे ः वेदांत पाटील, सार्थक कुळये, पवन शिगवण. ८० मीटर हर्डल्स ः देवेंद्र लिंबुकर, रोमित जाधव, सौरभ माटल. लांब उडी ः सार्थक कुळये, नैतिक कदम. उंच उडी ः सूरज भैरे, अथर्व पातेरे. गोळाफेक ः शुभम आखाडे, नूरआलम अन्सारी, संकल्प गुरव. थाळीफेक ः नूरआलम अन्सारी, नुमान चरके. भालाफेक ः साज जाधव, धनराज शिंदे, आराध्य कदम.
१६ वर्षाखालील मुली ः ६० मीटर धावणे वेदिका जगदाळे, तन्वी पवार. ६०० मीटर धावणे ः स्वरा उपशेटे, पायल खाके, प्राप्ती तरळ. ८० मीटर हर्डल्स ः अस्मिता पळसमकर, पायल खाके, इच्छा भिंगे. लांब उडी ः वेदिका जगदाळे, श्रेया मरकड, कार्तिकी कांबळे. उंच उडी ः सानवी चव्हाण, निधी शिगवण. गोळाफेक ः अपूर्वा गमरे, दानिया जुवाले, हस्ता कदम. थाळीफेक ः आस्था नवाले. भालाफेक ः मरियम वाडकर, आसावी मोरे, शमिका पवार.
१८ वर्षाखालील मुले १०० मीटर धावणे ः तन्मेश कटनाक, रूद्र वाडेकर, सनी बदड. २०० मीटर धावणे ः सनी बदड, पृथ्वीराज ढोबल. ४०० मीटर धावणे ः कार्तिक पावस्कर, मनीष पालये, विपुल साळवी. १००० धावणे ः आयुष बर्जे, पृथ्वी राजभर, सुनील रेवाळे. ५ किमी चालणे ः आदित्य जाधव, वंश पावस्कर. लांब उडी ः आदित्य पाटील, तन्मय घाणेकर, आदर्श माईंगडे. उंच उडी ः साईराज आंब्रे, शुभम ढेबे, ओमकार शिंदे. गोळाफेक ः साईराज आंब्रे, निनाद महाबळे. थाळीफेक ः अरहान झांबारकर, निनाद महाबळे, हर्षवर्धन मदने. भालाफेक ः अरहान जांभारकर, ऋतुराज लांजेकर, हर्षवर्धन मदने.
१८ वर्षाखालील मुली १०० मीटर धावणे ः अनुष्का दोरकडे, प्रिती पंडित, मनस्वी कांबळे. २०० मीटर धावणे ः आर्या पवार, वैदही गुरव, वैष्णवी गुरव. ४०० मीटर धावणे ः वैदही गुरव, रिया आग्रे. १००० मीटर धावणे ः सिमरन पवार, साक्षी मांडवकर. ५ किमी. चालणे ः श्रुती जोशी, कल्याणी तरळ. लांब उडी ः तनुजा घाणेकर, सिमरन पवार, शिवानी मिरजोळकर. गोळाफेक ः श्रावणी खाके, फातिमा चरके, संजीवनी जाधव. थाळीफेक ः शिवानी जाधव, श्रेया पातेरे. भालाफेक ः श्रेया पातेरे, फातिमा चरके, श्रावणी खाके.
२० वर्षाखालील मुले १०० मीटर धावणे ः वंश तांबे, ऋतिक कदम, पवन शिगवण. २०० मीटर धावणे ः वंश तांबे, यशराज हळवनकर, अनुराग सरवंडे. ४०० मीटर धावणे ः यश सकपाळ, ओमकार जाधव, प्रणव पावरी. ८०० मीटर धावणे ः चेतन खामकर, हिमांशू लांबट. १५०० मीटर धावणे ः सुरज निवडेकर, अर्जुन पराडे. ५००० मीटर धावणे ः राज धुळप, यश पवार, अर्जुन पराडे. ११० मीटर हर्डल्स ः यज्ञेश सावंतदेसाई. ५ किमी. चालणे ः सरफराज शेख. लांब उडी ः यशराज हलनावर, समर्थ जंगम, राजमाने. उंच उडी ः आर्यन खेराडे. गोळाफेक ः पारस दिवाडकर, निखिल भोसले, श्रेयश प्रभुदेसाई. थाळीफेक ः श्रेयस साळवी, श्रेयस प्रभूदेसाई. भालाफेक ः व्यंकटेश इंदुलकर, संदीप चव्हाण, पारस दिवाडकर. हातोडा फेक ः सुरज नेवडेकर लांजा.
२० वर्षाखालील मुली २०० मीटर धावणे ः सिद्धी मोरे. १५०० मीटर धावणे ः प्रियांका जोगळे, देवयानी राठोड, सुविधा पानगले. ३००० मीटर धावणे ः ज्ञानेश्वरी भारती, पूजा गुरव. ५००० मीटर धावणे ः ध्रुविका माजलकर. लांब उडी ः वैष्णवी तांबे, श्रुती झिंबर. तिहेरी उडी ः मंजिरी गावडे. गोळाफेक ः सानिका विचारे, सिद्धी मोरे. थाळीफेक ः तनवी खाडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: आता बस झालं..आम्ही हरलो आहोत! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय

रश्मिका मंदानाने पहिल्यांदाच दाखवलं तिचं मंगळसूत्र; इतकं साधं अन् सुंदर की जान्हवीचं मंगळसूत्रही विसराल!

Stray Dog Attack : आईसोबत चाललेल्या मुलावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला; प्रसंगावधान राखून आईने स्वतःच्या अंगावर हल्ला झेलत मुलाचे प्राण वाचवले, झटापटीत आई गंभीर जखमी

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Abhijeet Dipke: जंतर-मंतर आंदोलनानंतर आता शाळांवर अभिजीत दिपकेंचा फोकस! शाळा सुधारा अभियान राबवणार; 'या' जिल्ह्यातून शुभारंभ होणार

SCROLL FOR NEXT