rat14p4.jpg -
57221
दापोलीः ओम साईराम मित्रमंडळाचा राजाच्या मंडप सजावटीचा श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मुहूर्तमेढ भूमीपूजन करताना मंडळाचे पदाधिकारी.
दापोलीचा राजा गणेशोत्सव तयारीला आरंभ
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १६ ः श्रावणाच्या पहिल्याच दिवशी ओम साईराम मित्रमंडळ आयोजित दापोलीचा राजा मानाच्या गणेशोत्सवाच्या तयारीला सुरवात झाली आहे. आजपासून मंडपाच्या उभारणी व सजावटीच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे.
बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी सुरू असून, आकर्षक रोषणाई, कलाकुसर आणि सुशोभित मंडपामुळे गणेशभक्तांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ''दापोलीचा राजा''चा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आकर्षक देखाव्याने साजरा होणार असल्याचा विश्वास मंडळाच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, सर्व गणेशभक्तांनी आणि नागरिकांनी आगामी उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.