rat14p11.jpg-
57270
रत्नागिरी ः जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन देताना महेश मांडवकर.
----------
शाळांमध्ये मोफत वायफाय सुविधा द्या
महेंद्र मांडवकर ; दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण
देवरूख, ता. १४ ः रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी शाळांमध्ये शिक्षकांच्या ऑनलाइन कामकाजासाठी व विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचा लाभ मिळण्यासाठी मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र मांडवकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष व शिक्षण समिती सभापतींना देण्यात आले आहे.
शासनाच्या विविध संकेतस्थळांवर माहिती भरणे, अहवाल सादर करणे आणि ऑनलाइन प्रशिक्षणासाठी शिक्षकांना सतत इंटरनेटची आवश्यकता असते; मात्र, जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ भागांतील शाळांमध्ये मोबाईलचे नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे संगणक, टॅब आणि स्मार्टटीव्ही उपलब्ध असूनही त्यांचा वापर करता येत नाही. नेटवर्क शोधण्यात वेळ जात असल्याने अध्यापनावर परिणाम होतो तसेच शिक्षकांना स्वतःच्या खर्चातून मोबाईल डाटा वापरावा लागतो, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. जिल्ह्यातील इंटरनेट नसलेल्या शाळांची माहिती मागवून येत्या १५ दिवसांत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा करून संपूर्ण जिल्ह्यात ही योजना तत्काळ लागू करावी, असेही मांडवकर यांनी सुचवले आहे.
चौकट
या आहेत प्रमुख मागण्या
* सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये वायफाय इंटरनेट सुविधा सुरू करा
* नेटवर्क नसलेल्या शाळांना प्रथम प्राधान्य द्या
* नेटवर्क असेल त्या कंपनीची अमर्यादित डाटा जोडणी द्या
* वीज खंडित झाल्यास इंटरनेट सुरू राहण्यासाठी बॅकअपची तरतूद करा
* या सुविधेचा सर्व मासिक खर्च जिल्हा परिषदेने करावा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.