जलसाक्षरतेसाठी चिपळुणात
डिसेंबरमध्ये हाफ मॅरेथॉन
संकेतस्थळाचे आज उद्घाटन
चिपळूण, ता. १४ ः येथील संघर्ष क्रीडा मंडळातर्फे आयोजित ‘चिपळूण हाफ मॅरेथॉन’चे तिसरे पर्व २७ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडणार आहे. यंदा ही मॅरेथॉन ‘जलसंवर्धन’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित असून, या द्वारे जलसाक्षरता आणि पाणीबचतीचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवला जाणार आहे.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्टला मॅरेथॉनच्या अधिकृत संकेतस्थळाचे (वेबसाईट) उद्घाटन होणार आहे. याच दिवसापासून धावपटूंसाठी नोंदणी शुल्कावर ५० टक्के सवलतीची विशेष ऑफर लागू केली जाणार आहे. या सवलतीचा जास्तीत जास्त धावपटूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ही स्पर्धा ५, १० आणि २१ किलोमीटर अशा तीन वेगवेगळ्या अंतरांमध्ये सर्व वयोगटांसाठी आयोजित केली आहे. विविध गटांतील विजेत्यांसाठी आकर्षक आणि भरघोस रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. इच्छुकांना योग्य आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण मिळावे यासाठी १५ ऑगस्टनंतर दर रविवारी ''प्रोमो रन''चे आयोजन केले जाईल. जलसंवर्धनाच्या संदेशासोबतच कोकणातील पर्यटनाला चालना देणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. डिसेंबर महिन्यातील अनुकूल हवामानामुळे क्रीडा पर्यटनाला मोठा वाव मिळेल. गेल्या दोन वर्षांत राज्यभरातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यंदाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने धावपटू दाखल होतील, असा विश्वास संघर्ष क्रीडा मंडळाने व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.