कोकण

कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी रेलरोकोचा इशारा

CD

प्रलंबित मागण्यांसाठी
‘रेल रोको’चा इशारा
रत्नागिरी, ता. १६ : कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीची सभा खेडशी येथील महालक्ष्मी मंदिर सभागृहात झाली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांतील पदाधिकारी, प्रकल्पग्रस्त सभासद या वेळी उपस्थित होते.
समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी प्रकल्पग्रस्त उमेदवारांची वयोमर्यादा ४५ वर्षांपर्यंत वाढवल्याबद्दल कोकण रेल्वे प्रशासनाचे स्वागत केले. मात्र, डी ग्रुप भरतीतील नकारात्मक गुणांकन रद्द करावे, तसेच ४५ वर्षांपर्यंतच्या उमेदवारांसाठी १ किलोमीटर धावणे व ३५ किलो वजन घेऊन १०० मीटर धावण्याची कठीण शारीरिक चाचणी रद्द करावी, अशी मागणी समितीने केली.
प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी करावी आणि मेरिट लिस्टची अट रद्द करावी, अशीही मागणी केली. याबाबतचे निवेदन कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष झा, तसेच तिन्ही जिल्ह्यांतील आमदार-खासदारांना पाठवण्यात येणार आहे. भरतीपूर्वी मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास कोकण रेल्वे रोखून ‘रेल रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा समितीने दिला. सभेला कार्याध्यक्ष विनायक मुकादम यांच्यासह तिन्ही जिल्ह्यांतील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Governor Inflation: साखर-कांद्याने वाढवली महागाईची चिंता! दिवाळीत महागाई वाढणार? RBIचा मोठा इशारा

कियारा अडवाणी- सिद्धार्थ मल्होत्रा यांनी पुन्हा एकदा दिली गुड न्यूज; मुलगी सामायराही सोबत; फोटो व्हायरल

Navratra 2026: नवरात्री दरम्यान दुर्गा पूजेसाठी कडक नियमावली; मंडप आणि विसर्जन मिरवणुकीत डीजेवर पूर्ण बंदी!

Latur Professor Murder : अनैतिक संबंधातून कोल्हापूरच्या प्राध्यापकाची हत्या; लातूरमधून अपहरण करुन बीडमधील खडी क्रशरवर नेले अन्... चौघांना अटक

IND U19 vs AUS U19 : तन्मय बलोडाच्या १४ विकेट्स अन् ऑस्ट्रेलियाची दाणादाण; भारताने ५ चेंडूंत जिंकली मॅच, मालिका खिशात

SCROLL FOR NEXT