५ हजार ३७० शिक्षकांची
ई-केवायसी प्रलंबित
जन्मतारखेत तफावत; ऑगस्ट, सप्टेंबरचे वेतन रखडणार
रत्नागिरी, ता. १६ ः शालार्थ प्रणालीद्वारे दरमहा वेतन घेणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी राज्यशासनाने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले आहे; मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील ५ हजार ३७० शिक्षकांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप प्रलंबित असल्यामुळे त्यांच्या वेतनावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. निर्धारित वेळेत ई-केवायसी पूर्ण न केल्यास ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या वेतनाला विलंब होण्याची शक्यता वर्तवली आहे.
ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी सध्या शिक्षकांना बँका आणि आधारकेंद्रांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. यामध्ये सर्वाधिक फटका विवाहित महिला कर्मचाऱ्यांना बसत आहे. नोकरीत रूजू होताना माहेरचे नाव तर लग्नानंतर आधार व अन्य ओळखपत्रांवरील नाव बदलल्याने शालार्थ प्रणालीतील नावात तफावत निर्माण होत आहे. या तांत्रिक त्रुटींमुळे ई-केवायसी प्रक्रिया रद्द होत असून, नावात दुरूस्ती करण्यासाठी शिक्षिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शासकीय वेतनप्रक्रियेत पारदर्शकता आणणे, कर्मचाऱ्यांची अचूक ओळख पटवणे आणि शालार्थ प्रणालीतील बोगस नोंदींना आळा घालणे, या उद्देशाने शासनाने ई-केवायसीची अट सक्तीची केली आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणारे ई-केवायसी प्रमाणपत्र संबंधित शाळांच्या वेतन व संवितरण अधिकाऱ्यांकडे सादर करणेही अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडी आणि आधारकार्डावरील नाव किंवा जन्मतारखेत तफावत आहे त्यांनी आवश्यक कागदपत्रे जोडून तातडीने दुरूस्ती करून घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सर्व गटशिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांना पत्र पाठवून ई-केवायसी प्रक्रिया १०० टक्के पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.