कोकण

देवरूख ः येथे ''कर्तव्य संहिता वाचनालया''चे लोकार्पण

CD

rat14p18.jpg-
57325
देवरूख ः कर्तव्यसंहिता वाचनालयाच्या लोकार्पणावेळी आमदार शेखर निकम. सोबत महसूलचे अधिकारी.
--------
देवरूखात ‘कर्तव्यसंहिता वाचनालया’चे लोकार्पण
महाराजस्व अभियान; देवरूख मंडळ कार्यालय स्मार्ट बनवण्यावर भर
देवरूख, ता. १६ ः छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानानिमित्त देवरूख येथील मंडळ अधिकारी कार्यालयात महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांचा आरंभ करण्यात आला. देवरूख येथे ‘कर्तव्यसंहिता वाचनालया’चे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या वेळी पंचायत समिती सभापती शर्वरी वेल्ये, पंचायत समिती सदस्य प्रफुल्ल बाईत, तहसीलदार अमृता साबळे उपस्थित होते. जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांच्या प्रेरणेने तसेच तहसीलदार अमृता साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूख कार्यालयाचा हा कायापालट केला आहे. लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या ‘कर्तव्यसंहिता वाचनालयात’ १००हून अधिक कायदेविषयक पुस्तके, विविध अधिनियम, संहिता आणि संदर्भग्रंथ उपलब्ध केले आहेत. ही पुस्तके नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनासाठी असून, यातून महसूल व कायदेविषयक साक्षरता वाढण्यास मदत होणार आहे.

चौकट
कामाबाबतच्या अभिप्रायासाठी क्युआर कोड
देवरूख मंडळ अधिकारी कार्यालय हे जिल्ह्यातील एक मॉडेल कार्यालय म्हणून नावारूपाला येत असून, येथे आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. नागरिकांना कामाबाबत तत्काळ अभिप्राय नोंदवण्यासाठी ‘क्युआर कोड’ प्रणालीचा उपयोग केला गेला आहे. यासह शासकीय शुल्काची स्पष्ट माहिती देणारे फलक, महसूल विभागाच्या विविध डिजिटल सेवांची नागरिकांना माहिती देणे, दैनंदिन कामकाजाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पद्धतीनुसार सुयोग्य नियोजन, ‘ई-फेरफार कार्यप्रदर्शन फलक’ आणि ‘साप्ताहिक महसूल विचार’द्वारे कामात पारदर्शकता ठेवण्यावर भर दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जलपर्णीतून बायोसीएनजी, प्लास्टिकमधून क्रूड ऑइल...गडकरींनी प्रदुषणावर सांगितला उपाय

Auric Land Row: ऑरिक विस्तारासाठी भूसंपादनाविरोधात सहा गावांचा एल्गार; शासनाच्या माहितीपत्रकांची होळी, निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

Marathi News Live Updates : पुण्यात भीषण अपघात, डंपरची दुचाकीला धडक, संतप्त नागरिकांचा भावडी रोडवर रास्ता रोको

Sukhapuri Tragedy: सुखापुरीत विजेच्या धक्क्याने वानर पिल्लाचा मृत्यू; कळपाचा शोक, गावकऱ्यांचा अंत्यसंस्कारातून माणुसकीचा संदेश

IND vs SL, Test : एकदिवस आधी रिटायर्ड हर्ट झाला, दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरला... पण KL राहुलचं शतक थोडक्यात हुकलं!

SCROLL FOR NEXT