कोकण

स्वातंत्र्य दिन ः संक्षिप्त

CD

रत्नागिरी परिमंडल कार्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा
रत्नागिरी ः महावितरणच्या रत्नागिरी परिमंडल कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रत्नागिरी मंडलाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अनुराधा आंधनसरे, हरी ताम्हणकर, अजय निकम, प्रणाली विश्लेषक राजाराम काळे, श्रीकृष्ण वायदंडे, मिलिंद कानडे उपस्थित होते. या वेळी ४७ व्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या सांघिक कबड्डी स्पर्धेमध्ये ‘सुवर्णपदक’ मिळवल्या बद्दल नितेश प्रकाश पोवार कनिष्ठ सहाय्यक (लेखा) यांना कर्मचारी कल्याण निधीमधुन धनादेश प्रदान करून सत्कार करण्यात आला.
---------

पैसा फंड हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांचा सन्मान
संगमेश्वर ः व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कुल संगमेश्वर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला संस्था पदाधिकाऱ्यांसह परिसरातील व्यापारी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्था उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, नरेंद्र कुष्टे, जितेंद्र प्रसादे, सचिन नारकर, समीर शेरे, गुलाम पारेख, उदय करमरकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रशालेतील दहावी, बारावी, शिष्यवृत्ती, एनएनएमएस, पाककृती स्पर्धा अशा विविध परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तु, प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. प्रशालेची विद्यार्थीनी क्रिशा दायमा हिने सर्वांना साक्षरतेची, व्यसनमुक्ती, समानतेची अशा विविध शपथ दिल्या. सूत्रसंचालन अर्चिता कोकाटे यांनी तर स्वातंत्र्य दिनाचे नियोजन क्रीडा शिक्षक नवनाथ खोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.

---------
नवभारत हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
खेड : नवभारत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, भरणे येथे ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष ॲड. तु. ल. डफळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव सुधीर वैराग, खजिनदार राजा बैकर, सदस्य स्वप्निल बैकर, प्राचार्य महेश बोधे, उपप्राचार्य, पर्यवेक्षक यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. श्री. बांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन केले. देशभक्तीपर गीते, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला.

-------
काळे विद्यालयात ९०० विद्यार्थ्यांची संगीत कवायत
चिपळूण ः तालुक्यातील पेढे परशुराम येथील भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या आर. सी. काळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. काल सकाळी मुख्याध्यापक विनायक माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘वंदे मातरम्’चे गायन करण्यात आले. याप्रसंगी सादर केलेल्या संगीत कवायतीत ९०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गुरुकुल विभागातील विद्यार्थ्यांनी लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या गार्गी राजेंद्र पवार व श्रीकृष्ण महाडिक तसेच इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आदित्य आनंद खांडेकर यांचा सत्कार करण्यात आला.
---------
rat१६p१७.jpg-
57471
रत्नागिरी : गोदुताई जांभेकर विद्यालयात स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी विद्यार्थी, विद्यार्थिनी.

जांभेकर विद्यालयात गुणवंतांचा गौरव
रत्नागिरी : गोदूताई जांभेकर विद्यालयात स्वातंत्र्यदिनी मुख्याध्यापिका संजना तारी यांनी ध्वजारोहण केले. प्रशालेतील विद्यार्थी व मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकले. एनसीसी छात्रांनी शिस्तबद्ध संचलन करून ध्वजाला मानवंदना दिली. इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या अक्षरा खामकर व आर्या दर्डे यांचा पालकांसमवेत सत्कार करण्यात आला. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका वैभवी नाखरेकर, समीक्षा सचिन लिंगायत व समीक्षा कमलाकर लिंगायत यांचाही गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना २०० गणवेश मोफत मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या शुभांगी अभ्यंकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रशालेची पटसंख्या वाढविण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल शिक्षकांचा सत्कार पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संतोष गोरीवले यांच्या हस्ते करण्यात आला.
-----------
rat१६p१८.jpg-
57472
रत्नागिरी : शिर्के प्रशालेत स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात विद्यार्थ्याचा गौरव करताना शाळा समिती अध्यक्ष मनोज पाटणकर. सोबत मुख्याध्यापक के. डी. कांबळे व अन्य शिक्षक.

शिर्के प्रशालेत विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रा. भा. शिर्के प्रशालेत विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक के. डी. कांबळे यांनी तंबाखूमुक्त भारत, कॉपीमुक्त परीक्षा इयत्ता दहावी-बारावी, साक्षर महाराष्ट्र या विषयाशी संबंधित शपथ विद्यार्थ्यांना दिली. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आणि क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समितीचे अध्यक्ष मनोज पाटणकर यांनी केले. इयत्ता पाचवी, सातवी, आठवी आणि चौथीमधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षकांचेही अभिनंदन करण्यात आले. अटल टिंकरिंग लॅबच्या उपक्रमांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. यानिमित्त चित्रकला स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. बाबासाहेब नानल गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री यांचे आयोजन केले. सहावीतील विद्यार्थ्यांनी संगीतबद्ध कवायत व एनसीसीच्या छात्रांनी संचलन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जलपर्णीतून बायोसीएनजी, प्लास्टिकमधून क्रूड ऑइल...गडकरींनी प्रदुषणावर सांगितला उपाय

Auric Land Row: ऑरिक विस्तारासाठी भूसंपादनाविरोधात सहा गावांचा एल्गार; शासनाच्या माहितीपत्रकांची होळी, निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

Marathi News Live Updates : पुण्यात भीषण अपघात, डंपरची दुचाकीला धडक, संतप्त नागरिकांचा भावडी रोडवर रास्ता रोको

Sukhapuri Tragedy: सुखापुरीत विजेच्या धक्क्याने वानर पिल्लाचा मृत्यू; कळपाचा शोक, गावकऱ्यांचा अंत्यसंस्कारातून माणुसकीचा संदेश

IND vs SL, Test : एकदिवस आधी रिटायर्ड हर्ट झाला, दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरला... पण KL राहुलचं शतक थोडक्यात हुकलं!

SCROLL FOR NEXT