57486
जिल्ह्यात पर्यावरणपूरक प्रकल्पांवर भर
पालकमंत्री नीतेश राणे ः झाराप येथे ‘गाव तिथे उद्योजक’ अभियान
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ ः जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती आणि येथील लोकांच्या गरजा लक्षात घेऊन पर्यावरणपूरक प्रकल्प आणल्यास गाव तिथे उद्योजक संकल्पना यशस्वी होऊ शकते. हे अभियान यशस्वी होण्यासाठी पालकमंत्री म्हणून माझे नेहमीच सहकार्य राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री नीतेश राणे यांनी झाराप येथे ‘गाव तिथे उद्योजक’ या राज्यातील पहिल्या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्यावतीने शनिवारी (ता. १५) येथील एमआयडीसी येथे कोकण विभागाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झाराप येथील आराध्या हॉटेल येथे ‘गाव तिथे उद्योजक’ अभियान, नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. पालकमंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार जठार, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष रवींद्र माणगावे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, व्यापारी महासंघ जिल्हाध्यक्ष संजय सावंत, चेंबर्स ऑफ कॉमर्सचे ट्रस्ट बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँन्ड अॅग्रीकल्चरचे उपाध्यक्ष संतोष राणे, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य राजन नाईक, मनोज वालावलकर, ॲड. नकुल पार्सेकर, विजय केनवडेकर, कुणाल वरसकर, विशाल कामत, मिलिंद प्रभू करुणाकर, सुनीता फाल्गुनी, बी. एस. राघवेंद्र, डॉ. दीपक परब, आनंद बांदिवडेकर, शशी चव्हाण, संजीव प्रभू, सीए सुनील सौदागर, अमित वळंजू, अभय वालावलकर उपस्थित होते.
श्री. पेडणेकर म्हणाले यांनी, गाव तिथे उद्योजक तयार करण्याची संकल्पना स्तुत्य आहे. या माध्यमातून तरुणांच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम चेंबर्स करणार आहे, असे सांगितले. श्री. माणगावे यांनी, माणसे नोकरीसाठी शहराकडे जाऊ लागल्याने गावे ओस पडली आहेत. हे कुठेतरी थांबावे, म्हणून गावात उद्योजक निर्माण झाला पाहिजे, असे प्रतिपादन केले. आमदार जठार, प्रमोद कामत यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संतोष राणे यांनी केले. प्रफुल्ल वालावलकर यांनी सूत्रसंचालन केले. नकुल पार्सेकर यांनी आभार मानले.
...................
जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नवाढीचे ध्येय
पालकमंत्री राणे म्हणाले, ‘‘जिल्ह्याच्या विकासात ''गाव तिथे उद्योजक'' अभियान महत्त्वाचे आहे. खासदार नारायण राणे यांनी नेहमीच दरडोई उत्पन्न कसे वाढेल, यावर भर दिला आहे. तोच दूरदृष्टिकोन ठेवून जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न हे येत्या दोन वर्षांत पाच लाखापर्यंत नेण्यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. जिल्ह्यातील दारिद्र्य संपवणे, कुपोषणमुक्त जिल्हा, रोजगार निर्मिती हा आपला दूरदृष्टीकोन आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.