कोकण

‘नशामुक्त’ अभियानातून एकतेचा संदेश

CD

57515
कोळंब ः सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी स्वयंसेवकांनी ग्रामपंचायत परिसरात स्वच्छता अभियान राबविले.


‘नशामुक्त’ अभियानातून एकतेचा संदेश

मालवणात ‘हर घर तिरंगा’; सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १६ : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने स्वच्छता पंधरवडा, नशामुक्त युवा अभियान आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या अनुषंगाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयात सकाळी ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ध्वजवंदन केले. या समारंभात एनएसएस स्वयंसेवकही सहभागी झाले. ध्वजारो ३७ स्वयंसेवकांनी महाविद्यालय-धुरीवाडा ते कोळंब पूल या मार्गावर जनजागृती रॅली काढली. स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि सामाजिक जबाबदारी यासंदर्भातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला. २०२६-२७ या वर्षासाठी एनएसएसचे दत्तक गाव म्हणून निवडलेल्या कोळंब येथे स्वच्छता अभियान राबविले. ग्रामपंचायत कार्यालय परिसरात स्वच्छता केली. सरपंच सिया धुरी यांचा एनएसएस विभागाच्यावतीने कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. उपसरपंच विजय नेमळेकर, ग्रामपंचायत अधिकारी युती चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य विशाल फणसेकर, संपदा प्रभू, संजना शेलटकर आणि नंदा बावकर यांनी उपस्थित राहून अभियानास सहकार्य व प्रोत्साहन दिले. मंडळ अधिकारी मीनल चव्हाण, तलाठी शिवलकर, कोतवाल पाताडे, आरोग्य विभागाचे डॉ. पवार तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भूपेश ढोलम, जान्हवी कांदळगावकर आणि प्राची पेडणेकर यांनीही स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. ग्रामस्थांच्या वतीने प्रसाद भोजने यांनी उपस्थित राहून अभियानास सहकार्य केले. सरपंच धुरी यांनी आभार मानले. या सर्व उपक्रमांचे डॉ. सुमेधा नाईक, डॉ. संकेत बेळेकर, प्रा. योगिता सावंत, प्रा. अनघा टिकले, गौतम मानवर, रिद्धी काजरेकर आणि अपूर्वा पालव यांनी नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जलपर्णीतून बायोसीएनजी, प्लास्टिकमधून क्रूड ऑइल...गडकरींनी प्रदुषणावर सांगितला उपाय

Auric Land Row: ऑरिक विस्तारासाठी भूसंपादनाविरोधात सहा गावांचा एल्गार; शासनाच्या माहितीपत्रकांची होळी, निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

Marathi News Live Updates : पुण्यात भीषण अपघात, डंपरची दुचाकीला धडक, संतप्त नागरिकांचा भावडी रोडवर रास्ता रोको

Sukhapuri Tragedy: सुखापुरीत विजेच्या धक्क्याने वानर पिल्लाचा मृत्यू; कळपाचा शोक, गावकऱ्यांचा अंत्यसंस्कारातून माणुसकीचा संदेश

IND vs SL, Test : एकदिवस आधी रिटायर्ड हर्ट झाला, दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरला... पण KL राहुलचं शतक थोडक्यात हुकलं!

SCROLL FOR NEXT