57565
जीवन शिक्षण शाळेत ‘स्वातंत्र्य दिन’
आरोंदा ः आरवली जीवन शिक्षण शाळा क्र. १ येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. केंद्रप्रमुख मारुती गुडुळकर, मुख्याध्यापिका सविता सातपुते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा डॉ. नेहा गावडे, उपाध्यक्ष मेस्त्री तसेच सर्व पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगणारी मनोगते सादर केली. तसेच राष्ट्रभक्तीपर गीते, कविता व विविध उपक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शाळेचा परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला. प्रियदर्शनी म्हाडगुत यांनी आभार मानले.
.................
57566
रेडी माऊली विद्यालयात ध्वजवंदन
आरोंदा ः श्री माऊली विद्यामंदिर व रेडी ग्रामपंचायत येथे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम देशभक्तीची उर्जा भरणारा ठरला. सर्व बाल गायक आणि बाल वादक कलाकारांच्या सुश्राव्य सादरीकरणामुळे परिसर राष्ट्रभक्तीच्या रंगात रंगून गेला. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व बाल कलाकार या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते पालक, ग्रामस्थ आणि अतिथी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन सुधाकर आडेलकर यांनी केले. शिरोडा हायस्कूलचे मुख्याध्यापक मंगेश कांबळी यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.
-------------------
चौकुळमध्ये गुणवंत विद्यार्थिनीतर्फे ध्वजवंदन
आंबोली : चौकुळ ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्य दिनी झालेल्या ध्वजवंदनाचा मान दहावी परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम आलेली चौकुळची सुकन्या भार्गवी शेटवे हिला देण्यात आला. ग्रामपंचायतीतर्फे तिचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. भार्गवीचे पणजोबा, आजोबा व वडील हे निवृत्त सैनिक असून त्यांच्या कुटुंबाला सैनिकी परंपरा लाभली आहे. यावेळी चौकुळचे प्रशासक गुलाबराव गावडे, सर्व प्रशासकीय समिती सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी अमित राऊळ, ज्येष्ठ शिक्षक गावडे, चेअरमन पांडुरंग गावडे, माजी सैनिक, ग्रामपंचायत प्राधिकरणातील सर्व कर्मचारी, पोलिसपाटील आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.