कोकण

संजू परब यांच्या वाढदिनी विविध उपक्रम ः कविठकर

CD

57578

संजू परब यांच्या वाढदिनी
विविध उपक्रम ः कविठकर
सावंतवाडी, ता. १६ ः शिवसेना जिल्हाप्रमुख, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा वाढदिवस १९ ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. १८) नगरसेवक देव्या सूर्याजी मित्रमंडळ, युवा रक्तदाता संघटना तसेच शिवसेनेच्यावतीने रक्तदान शिबिर, सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग येथील रुग्णालयांत पंखे वाटप, लाखे वस्तीतही पंखे वाटप करण्यात येथील. तिन्ही तालुक्यांमध्ये सुमारे ५ हजार रोपांचे वाटप होणार आहे. सावंतवाडीतील शाळांमध्ये साहित्य, रोणापाल छात्रालयामध्ये खाऊ वाटप व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. कोंडुरा येथील विशेष शाळेत फळवाटप, आरोंदा येथील शाळांमध्ये वह्या वाटप, सावंतवाडी पालिका सफाई कर्मचाऱ्यांना धान्य वाटप करण्यात येणार असल्याचे ॲड. नीता सावंत यांनी सांगितले. बुधवारी (ता. १९) सकाळी १०.३० वाजता गोविंद चित्रमंदिर, सावंतवाडी येथे वाढदिवस साजरा होईल. या कार्यक्रमास सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर, कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार नीलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी सभापती सुस्मिता जाधव, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, माजी सभापती अशोक दळवी, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, नारायण राणे, शहरप्रमुख बाबु कुडतरकर, झेवियर फर्नांडिस, परीक्षित मांजरेकर, शरद धाऊसकर, नगरसेवक शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, महिला शहरप्रमुख भारती मोरे, स्नेहा टिळवे, राजन रेडकर, नगरसेवक देव्या सूर्याजी, विनोद नाईक, क्लेटस फर्नांडिस, सचिन साटेलकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: सकाळी ५ वाजता ग्राउंड अन् रात्रीपर्यंत अभ्यास; वैशालीने जिद्दीने मिळवली कारागृह पोलिसाची वर्दी, शेतकरी कुटुंबातील लेकीची प्रेरणादायी भरारी..

Gokul Election: आमचे उमेदवार कोल्हापुरात ठरतात; सतेज पाटील

Ladki Bahin Yojana September Installment Date : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! सप्टेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? समोर आली संभाव्य तारीख

LPG Cylinder Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर LPG सिलिंडरचे काय झाले? सणासुदीआधी नवे दर जाहीर; आता कितीला मिळतोय?

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीची रणनीती ठरली! मुख्यमंत्र्यांच्या दरबारात जागावाटपाचा तिढा सुटला; राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा, तर भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 7

SCROLL FOR NEXT