कोकण

टेबल टेनीसमध्ये गोगटेस सुवर्ण

CD

-rat१६p८.jpg-
26O57459
रत्नागिरी : टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचा चमू.

टेबल टेनिसमध्ये ‘गोगटे’स सुवर्ण
रत्नागिरी : आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या पुरुष संघाने सुवर्णपदक, आणि महिला संघाने कांस्य पदक पटकावले. कोंकण विभाग व घरडा इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी महाविद्यालयाने (खेड) या स्पर्धांचे आयोजन केले. पुरुष संघात अथर्व म्हस्के, आदित्य शिर्के, रोहन जाधव, आदित्य लांजेकर (तृतीय वर्ष विज्ञान); विशाल परिहार (तृतीय वर्ष बीबीए) हे विद्यार्थी सहभागी झाले होते. महिला टेबल टेनिस विजयी संघात स्नेहा कदम, मैथिली डोर्लेकर, श्रावणी शिंदे (तृतीय वर्ष विज्ञान), समृद्धी मुळ्ये, आदिती जड्यार (तृतीय वर्ष बीबीए) या विद्यार्थिनी सहभागी झाल्या. संघांना क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे यांचे मार्गदर्शन व क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके, श्रीपाद गुरव यांचे सहकार्य लाभले.

-rat१६p२.jpg-
26O57453
रत्नागिरी : जांभेकर विद्यालयात दीपप्रज्वलन करताना मुख्याध्यापिका संजना तारी व विद्यार्थिनी.

जांभेकर विद्यालयात दीपोत्सव उत्साहात
रत्नागिरी : सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात दीप अमावस्येनिमित्त दीपोत्सव उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. दीपोत्सवानिमित्त प्रशालेच्या परिसरात आकर्षक पद्धतीने पणत्या, समया व निरांजने प्रज्वलित करून दीपांची आरास करण्यात आली. प्रारंभी मुख्याध्यापिका संजना तारी यांच्या हस्ते प्रज्वलित केलेल्या दिव्यांना पुष्प अर्पण करून दीपपूजन करण्यात आले. या प्रसंगी प्रशालेतील वातावरण प्रकाशमय आणि मंगलमय झाले होते.

-rat१६p५.jpg-
26O57456
पार्वती रावल

पार्वती रावलची प्लेक्सिमस कंपनीत निवड
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स भाग- २ अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी पार्वती रावल हिची प्लेक्सिमस आयनएसी या कंपनीमध्ये कनिष्ठ मनुष्यबळ कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. शिक्षण घेत असतानाच तिने कॉर्पोरेट क्षेत्रात आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली आहे. पार्वतीच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, संगणकशास्त्र व डेटा सायन्स विभागप्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे, आय.टी. सी.एस. समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे आदींनी तिचे अभिनंदन केले.


-rat१६p४.jpg-
26O57455
करण मिलके
------
करण मिलकेची सॉफ्टवेअर डेव्हलपरपदी निवड
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात एम. एस्सी. डेटा सायन्स अभ्यासक्रमाचा विद्यार्थी आणि जलतरणपटू करण महेश मिलके याची आय लोसुंग प्रा. लि. कंपनीमध्ये असोसिएट सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून निवड झाली आहे. त्याला वार्षिक ३.६० लाखांचे पॅकेज मिळाले आहे. पुणे येथील प्रकल्पस्थळी तो काम करणार आहे. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्याडॉ. अपर्णा कुलकर्णी, संगणकशास्त्र व डेटा सायन्स विभागप्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे, आय.टी. सी.एस. समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे यांनी त्याचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा! विनोद तावडे, वसुंधरा राजे अन् स्मृती इराणी यांच्याकडे मोठी जबाबदारी, वाचा यादी...

खराब अन्न मिळालं? आता QR कोड स्कॅन करा, फोटो-व्हिडिओसह तक्रार करा, FDA चा मोठा निर्णय, नेमकी सुविधा काय?

'धर्मवीर' पाहिल्यावर रस्त्यावर प्रसाद ओकची वाट पाहत थांबलेले उद्धव ठाकरे; अभिनेत्याने सांगितला तो प्रसंग; म्हणाला- त्यांनी...

Marathi News Live Updates : नागपूरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस

IND vs SL 1st Test: श्रीलंकेचा पलटवार, भारताचे गोलंदाज झाले गार! २०१५ मध्ये जे घडलं होतं, तसंच होण्याची भीती; गौतम गंभीरला आठवलं तेव्हा नेमकं काय झालेलं...

SCROLL FOR NEXT