कुणबी पतसंस्थेचा ११ टक्के लाभांश
चंद्रकांत परवडी ः ‘अ’ वर्गाची परंपरा कायम
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १७ ः येथील कुणबी विकास सहकारी पतसंस्थेचा एकत्रित व्यवसाय १४४ कोटी ५० लाख ८१ हजार २८७ असून निव्वळ नफा १ कोट ३ लाख ४६ हजार ७२३ रुपये आहे. पतसंस्थेने सभासदांना ११ लाभांश मंजूर केला आहे. संस्थेच्या लांजा, रत्नागिरी, देवरुख, चिपळूण, राजापूर, दापोली, गुहागर, मंडणगड आणि खेड अशा सर्व शाखा नफ्यात आहेत, अशी माहिती अध्यक्ष चंद्रकांत परवडी यांनी दिली.
कुणबी विकास सहकारी पतसंस्था लांजा या संस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा कुळकर्णी-काळे छात्रालय येथील सभागृहात चंद्रकांत परवडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप डाफळे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी ज्येष्ठ सभासदांचा आणि पिग्मी व रिकरिंग प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला. रत्नागिरी शाखेचे शाखाधिकारी जयवंत खुलम यांनी २१ वर्षे यशस्वी सेवा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचा ऑडिट वर्ग सतत ‘अ’ राहिला असून वसुलीचे प्रमाण ९६.३३ टक्के आहे. संस्थेचे सभासद १० हजार ४०७ असून भागभांडवल ३ कोटी २८ लाख ८४ हजार ४५० रुपये आहे. एकूण निधी ५ कोटी ९० लाख १८ हजार ३९ रुपये तर, ठेवी ८४ कोटी ८ लाख १७ हजार ७६८ रुपये आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.