कोकण

शिष्यवृत्ती परीक्षेत श्रेया तांबे चमकली

CD

57722

शिष्यवृत्ती परीक्षेत
श्रेया तांबे चमकली
कणकवली : उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता ७ वी) परीक्षेमध्ये तालुक्‍यातील हरकुळ बुद्रुक येथील लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालयाच्या श्रेया भगवान तांबे हिने ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत ६८ टक्के गुणांसह यश प्राप्त करून जिल्ह्यात ३३ वा क्रमांक पटकाविला. तर याच प्रशालेच्या देवयानी संतोष मोरये आणि गिरीजा तुकाराम मोडक यांनीही उल्लेखनीय यश मिळविले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच ल. गो. सामंत विद्यालयात झाला. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. सुहास पावसकर, सदस्य बाबासाहेब वर्देकर, भूषण वाडेकर, सुनील घाडीगावकर, प्रभारी मुख्याध्यापिका सौ. रश्मी नवाळे, शिक्षिका सुमन तांबे उपस्थित होते.
---
हेत केंद्रशाळेचे
शिष्यवृत्तीत यश
वैभववाडी : तालुक्यातील केंद्रशाळा विद्यामंदिर, हेत येथील इयत्ता ४ थी व ७ वीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळाले आहे. इयत्ता ७ वीतून तनिष्का बुराण ही तालुक्यात प्रथम आली, तर आर्या फोंडके ही सहाव्या क्रमांकावर राहिली. इयत्ता ४ थीतून यश फोंडके हा तालुक्यात आठवा आला. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संतोष मोरे, प्रीती जाधव, हनुमंत गिते आणि रुपाली कांबळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी इतर स्पर्धा परीक्षांमध्येही उल्लेखनिय कामगिरी केली आहे.
-----
वेतोरे येथे आजपासून
श्रावण कीर्तन महोत्सव
वेंगुर्ले : येथील वेतोरे येथील देवी सातेरी मंदिरात १८ ते २० ऑगस्ट रोजी श्रावण कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ऑगस्ट रोजी मनोज खोचरे (घावनळे), १९ ऑगस्ट रोजी हरिहर नातू (मालवण) आणि २० ऑगस्ट रोजी सिद्धी मेस्त्री (ओटवणे) यांची कीर्तनसेवा होणार आहे. कार्यक्रमास हार्मोनियम साथ गजानन मेस्त्री, तबला साथ गणेश वेतोरकर आणि सार्थक जामदार करणार आहेत.
-----
एकात्मिक आरोग्यवर्धिनी
समितीवर संजय गावडे
सावंतवाडी : विधानसभा मतदारसंघातील आरोग्यविषयक नियोजन आणि आरोग्य सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाच्या मान्यतेने ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती, सावंतवाडी’ स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, तर सदस्य म्हणून उभादांडा जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य संजय गावडे यांची निवड झाली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश सुबराव कर्तस्कर हे समितीचे सचिव आहेत. या समितीच्या माध्यमातून आरोग्य सुविधांचा प्रभावी वापर केला जाणार आहे.
---
जयराम जाधव यांना
जिल्हा युवा पुरस्कार
ओरोस : येथे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते ‘माय भारत’ नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक आणि पंचायत सदस्य जयराम जाधव यांना प्रतिष्ठित ‘जिल्हा युवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. जयराम जाधव हे नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक आणि सामाजिक प्रशिक्षक असून त्यांना महाराष्ट्र शासनाचा हा पुरस्कार मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंड विद्यार्थी आंदोलनापुढे सरकार झुकलं! JSSC CGL परीक्षा रद्द; मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा

Karad News : कऱ्हाडचे अमोल होमकर सीआरपीएफचे महानिरीक्षक; संवेदनशील मणिपूर, नागालँडची जबाबदारी

Koregaon News : वडिलांची चित्रकला जपतोय मुलगा! बारावीतील अवधूत साकारतोय अनेक मान्यवरांची हुबेहूब पोर्ट्रेट

Donald Trump: इराणशी गुप्त चर्चेमागे कोण? ट्रम्प प्रशासनाने IRGC पर्यंत कशी पोहोच मिळवली? सीक्रेट कनेक्शन आलं समोर

MPSC Exam : जिद्द अन् परिश्रमातून यश; कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT