swt1718.jpg
57762
मांगेली : येथील धबधब्यावरील टाकाऊ कचरा गोळा करताना भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी.
मांगेली धबधब्याजवळ स्वच्छता मोहीम
भाजप युवा मोर्चाचा पुढाकार : विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचेही वाटप
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १७ : भाजप युवा मोर्चा दोडामार्गच्या माध्यमातून मांगेली धबधबा पर्यटनस्थळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मांगेली जिल्हा परिषद शाळा व मांगेली माध्यमिक विद्यालय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा करण्यात आले.
मांगेली निसर्ग संपन्न भागात असलेल्या पर्यटन स्थळावर हजारो पर्यटक उपस्थिती लावतात. सर्व परिचित असलेले हे पर्यटन स्थळ पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. गोवा सहित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व कर्नाटक राज्यातील पर्यटक येथील धबधब्याचा आनंद लुटतात. मात्र, खाद्यपदार्थाचे प्लास्टिक, प्लास्टिक बॉटल, तसेच अन्य टाकाऊ वस्तू त्याच परिसरात अस्ताव्यस्त टाकून हे पर्यटक वापस निघून जातात. त्यामुळे पर्यटन स्थळाची स्वच्छता राहत नाही. याकडे जाणीवपूर्वक लक्ष घालून भाजप जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष संदीपजी मेस्त्री, सरचिटणी संतोष पुजारे यांच्या उपस्थितीत युवा मोर्चाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी दीपक गवस, देवेंद्र शेटकर, पराशर सावंत, अंकुश नाईक, ओमकार रेडकर, राज बोन्द्रे, मंथन डिंगणेकर, राजन सावंत, अरविंद धर्णे, मांगेली उपसरपंच सुनील गवस, गुरुदास गवस, दिलखुश देसाई, विशाल नाईक, औदुंबर बांदेकर, रामेश्वर गवस, कृष्णा गवस, धनंजय धर्णे, प्रदीप गावडे, सुशांत घाडी, विजय कांबळे श्रेयश सावंत, आकाश नाईक,आकाश नाईक, महादेव तर्पे, श्रेयस गवस, भीमसेन परब, ओम तुंबरे, तेजस गवस, निरज लोके उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.