swt१७२३.jpg
57767
कोचरा : रस्त्याचे भूमिपूजन करताना सभापती शंकर घारे. सोबत सचिन वालावलकर व इतर मान्यवर.
राजकीय स्पर्धेपेक्षा विकासकामांची स्पर्धा व्हावी
सभापती शंकर घारे : कोचरा येथे विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १७ : कोचरा गावातील नागरिक समाधानी आहेत. कारण या गावाला योगेश तेली यांच्यासारखा सेवाभावी आणि समर्पित वृत्तीने काम करणारा सरपंच लाभला आहे. राजकीय स्पर्धेपेक्षा विकासकामांची स्पर्धा झाली पाहिजे, असे प्रतिपादन येथील पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनी केले.
कोचरा येथे जिल्हा वार्षिक योजना, आमदार स्थानिक विकास निधी, ग्रामविकास विभागाच्या २५/१५ योजनेसह विविध योजनांतर्गत मंजूर व पूर्ण झालेल्या विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. शंकर घारे, सचिन देसाई, यज्ञा साळगावकर, सचिन वालावलकर, विष्णू फणसेकर, सरपंच योगेश तेली, बाळा दळवी, हर्षद डेरे, मितेश परब, गुरुनाथ शिरोडकर, आनंद गावडे, अविनाश खोत, सुभाष चौधरी, यशवंत गोसावी, आनंद गावडे, अनिल सुतार, विशाल वेंगुर्लेकर, संजय गोसावी, पूजा नांदोस्कर, प्रगती राऊळ, उर्मिला खडपकर, सुनिता परब, स्वरा हळदणकर, सौरभ राऊळ आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात कोचरा-म्हापण मुख्य रस्ता ते श्री वाघोबा मंदिर रस्ता काँक्रीटीकरण या सुमारे १० लाख रुपये खर्चाच्या विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच कोचरा गावातील पर्यटनस्थळे व वॉटर स्पोर्ट्सची माहिती दर्शविणाऱ्या फलकांचे अनावरण, ग्रामपंचायत इमारतीचे सुशोभीकरण आणि ग्रामपंचायत इमारतीत उभारलेल्या सुसज्ज व्यायामशाळेचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर, उपसभापती सचिन देसाई यांनी मार्गदर्शन केले.
चौकट
गावाचा विकास हाच माझा उद्देश
सरपंच योगेश तेली यांनी गावकऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी विविध कामे करण्याचा प्रयत्न सुरू असून, या कामांमध्ये वैयक्तिक हितापेक्षा गावाचा विकास हाच केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी कोणतेही काम केलेले नाही. गावाचा विकास हाच माझा उद्देश असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.