कोकण

चिपळूण : गणेशोत्सवात चिपळूणात वाहतूक कोंडी ?

CD

rat17p3.jpg -
57710
चिपळूण : सेवा रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढली की वाहतूक कोंडीचा त्रास होतो.

गणेशोत्सवात चिपळुणात वाहतूक कोंडी ?
प्रभावी नियोजनाची गरज; इंधन भरणाऱ्या वाहनांचा अडथळा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या प्रचंड असते. या काळात मुंबई, ठाणे, पुण्यासह विविध शहरांतून लाखो नागरिक आपल्या खासगी वाहनांनी गावी रवाना होतात. वाढीव वाहतुकीचा मोठा ताण चिपळूण शहरावर येण्याची शक्यता असल्याने, संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आतापासूनच प्रभावी नियोजन करण्याची गरज आहे.
चिपळूण शहरातील उड्डाणपुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या स्लॅब टाकण्याचे काम सुरू असले, तरी यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणे आवश्यक आहे. गणेशोत्सवापूर्वी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला, तर महामार्गावरील भार कमी होऊन वाहतूक सुरळीत होईल. मात्र, उड्डाणपूल सुरू न झाल्यास संपूर्ण वाहतूक अरुंद सेवा रस्त्यांवरच येऊन मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. चिपळूणमध्ये महामार्गालगत पेट्रोल आणि सीएनजी पंप असल्याने इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागतात. अनेकदा ही वाहने सेवा रस्त्यावरच उभी राहत असल्याने आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर वाहतूक ठप्प होते. गणेशोत्सवात वाहनांची संख्या वाढल्यानंतर ही समस्या अधिक गंभीर रूप धारण करू शकते.

चौकट
‘हे’ होणे अत्यावश्यक
* महामार्ग विभागाने शहरातील सेवा रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करावी.
* रस्त्याच्या कडेला असलेले अनधिकृत अडथळे, पार्किंग, अतिक्रमणे दूर करावीत.
* इंधन भरण्यासाठी रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांसाठी उड्डाणपुलाखालील जागा द्या.
* रिक्षा व्यावसायिकांना प्रवासी चढ-उतारासाठी विशिष्ट ठिकाणी जागा द्यावी.
* आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करून वाहतुकीचे नियमन करावे.

कोट
गणेशोत्सवातील वाहतूक लक्षात घेऊन महामार्ग विभाग, पोलीस प्रशासन, चिपळूण नगरपालिका आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे ''विशेष वाहतूक आराखडा'' तयार करणे आवश्यक आहे. उड्डाणपूल सुरू न झाल्यास सेवा रस्त्यांवरून वाहतूक कशी वळवायची, इंधन पंपांजवळ गर्दी कशी नियंत्रित करायची आणि रुग्णवाहिकांसारख्या आपत्कालीन वाहनांसाठी मार्ग मोकळा ठेवण्याचे नियोजन आधीच होणे गरजेचे आहे.
- राजू जाधव, चिपळूण

कोट
गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी सर्व विभागांची संयुक्त बैठक घेतली जाईल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली जाणार असून, वाहतूक पोलिसांसह होमगार्ड आणि महामार्गाचे काम करणाऱ्या एजन्सीचे कर्मचारी तैनात केले जातील.
- इर्शाद बेग, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, लोटे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SME Growth Fund : लघु आणि मध्यम उद्योगांसाठी १० हजार कोटींचा 'एसएमई ग्रोथ फंड'; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Marathi News Live Updates: पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’चा अहवाल

Sanchar Saathi Milestone : सायबर फसवणुकीविरोधात नागरिक बनले ‘योद्धा’! ‘संचार साथी’ पोर्टलने ओलांडला ३० कोटी भेटींचा टप्पा

Mumbai Police: 2 हजार 850 बनावट अ‍ॅप्स अन् 9 हजार 673 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

SCROLL FOR NEXT